नांदेड जिल्हा परिषदेला 23.कोटी लाख 26 रुपयाचा अर्थसंकल्प मंजूर; महिला, शेती, शिक्षण व आरोग्याला प्राधान्य! नांदेड (प्रतिनिधी) मोहम्मद रफीख नांदेड जिल्हा परिषदेचा सन 2026-27 साठीचा 23 कोटी 26 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सक्षम आरोग्य सेवा या चार प्रमुख आधारस्तंभांवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शिक्षण व युवक विकासावर भर शिक्षण विभागासाठी 1 कोटी 16 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. खेळाचे मैदान विकसित करणे व क्रीडा साहित्य पुरविण्यासाठी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञा प्रकल्प’ राबवून करिअर मार्गदर्शन व आर्थिक सहाय्यासाठी 32 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवा मजबूत ग्रामीण भागातील श्वानदंश व सर्पदंश रोखण्यासाठी 20 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक प्रसूती कक्षासाठी 20 लाख आणि आरोग्यदूत योजना, NQAS, क्षयरोगमुक्त गाव उपक्रमासाठी एकूण 45 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व कल्याण अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी 1 कोटी 56 लाखांचा निधी ठेवण्यात आला आहे. यामध्ये व्यवसाय सहाय्य, वाहन खरेदी अनुदान, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप मदत आणि गर्भवती महिलांसाठी अॅनोमली स्कॅनसाठी 40 लाखांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र 1 कोटी 16 लाखांची तरतूद आहे. शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी ड्रोन खरेदी (12 लाख), जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा (12 लाख), प्रिसीजन फार्मिंग (11 लाख) आणि सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 18 लाखांची मदत दिली जाणार आहे. पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 4 कोटी 65 लाखांचा निधी देण्यात आला आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 57 लाखांची तरतूद असून ग्रामविकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 78 लाख रुपये देण्यात आले आहेत. महिला व बाल विकास महिला व बाल विकासासाठी 78 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अंगणवाडीतील मुलांना गणवेश, डेस्क व भांडी पुरविण्यासह विधवा व घटस्फोटित महिलांच्या मुलांना सहाय्य दिले जाणार आहे. ठळक बाबी एकूण अर्थसंकल्प : 23.26 कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक निधी : 4.65 कोटी रुपये सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण : 2.72 कोटी रुपये प्राधान्य योजना प्रज्ञा प्रकल्प – विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आधुनिक शेती – ड्रोन व प्रिसीजन फार्मिंग आरोग्य – आरोग्यदूत, क्षयरोगमुक्त गाव अभियान हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील विकासाला गती देणारा ठरणार असून सर्व क्षेत्रांमध्ये संतुलित प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

- Post by Today One Live1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. 👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार 👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप 👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा 🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा! #Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews1