उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा *पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला. यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, उपचारांची गुणवत्ता आणि विविध विभागांतील कामकाजाची पद्धत याचीही त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ओपीडी, आपत्कालीन सेवा, तसेच इतर महत्त्वाच्या विभागांतील उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा, उपलब्ध सुविधांचा विस्तार तसेच रुग्णालयासमोरील अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र वाबळे तसेच वायसीएम रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ..... *कोट :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार, जलद आणि परिणामकारक आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. - शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp1
- *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1