Shuru
Apke Nagar Ki App…
सुट्ट्यांच्या बदल्यात बॉसची लेकराच्या महिलेकडे अश्लील मागणी
चंद्रकला हेमंत वळवी
सुट्ट्यांच्या बदल्यात बॉसची लेकराच्या महिलेकडे अश्लील मागणी
More news from Maharashtra and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.1
- 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.1
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- *ब्रेकिंग- मोकामा के घोसवरी प्रखंड के सम्यागढ़ में डीजे की धुन पर डांस करने को लेकर दो जाति में विवाद, जमकर मारपीट, डांस का विरोध करने पर, बदमाशों ने लाठी डंडे और हथियार लाकर शादी में शामिल परिवार और संबंधियों को जमकर पीटा और फायरिंग की जिसमें मौली महतो नामक शख्स को लगी गोली!कई थानों की पुलिस घटनास्थल पर पहुँची! माहौल बेहद तनावपूर्ण! सम्यागढ़ थानाक्षेत्र की घटना, जातीय संघर्ष के आसार!*1
- ११२ कर्णकर्कश सायलेन्सरचा चपातीसारखा चुराडा; पोलिसांच्या 'सिंघम' स्टाईलपुढे 'टवाळखोरांची' हवा गुल! नाशिक (खास प्रतिनिधी): कॉलेज रोडवर एखाद्या 'हिरो'सारखी एंट्री मारून, 'डॅम-डॅम' असा कानाचे पडदे फाडणारा आवाज करत मिरवणाऱ्या आणि स्वतःला रस्त्यावरचे 'बॉस' समजणाऱ्या बुलेटस्वारांची आता चांगलीच 'हवा' निघाली आहे! लोकांच्या छातीत धडकी भरवणारे हे टवाळखोर आता गपगुमान 'सायकल' चालवल्यासारखी बुलेट चालवताना दिसत आहेत. कारण? गंगापूर पोलिसांनी त्यांच्या लाडक्या आणि कर्कश सायलेन्सरवरून चक्क भलामोठा 'रोड-रोलर' फिरवला आहे! गेल्या काही दिवसांपासून कॉलेज रोडवर बुलेटच्या फटाक्यांनी नाशिककरांच्या नाकीनऊ आणले होते. म्हाताऱ्या-कोताऱ्यांची झोप उडवणाऱ्या आणि फक्त पोरींचे 'अटेन्शन' मिळवण्यासाठी कर्कश आवाज काढणाऱ्या या उपद्रवी बुलेटस्वारांचा माज उतरवण्यासाठी गंगापूर पोलिसांनी एक विशेष 'ऑपरेशन शांतता' राबवले. गुन्हेशोध पथकाने या ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गाड्या शोधून काढल्या आणि त्यांचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर चक्क उपटून काढले! *११२ सायलेन्सरचा झाला पापड!* ३० एप्रिल २०२६ रोजी कॉलेज रोड पोलीस चौकीबाहेर एकच थरार पाहायला मिळाला. जप्त केलेले तब्बल ११२ सायलेन्सर रस्त्यावर एका रांगेत लावले होते. आणि मग... 'सिंघम'च्या स्टाईलमध्ये आला एक महाकाय रोड-रोलर! एका क्षणात त्या सर्व ११२ सायलेन्सरचा 'पापड' झाला. तो कर्रर्रर्र... कडाडणारा आवाज ऐकून आजूबाजूला उभ्या असलेल्या बुलेटस्वारांच्या डोळ्यांतून नक्कीच पाणी आले असेल! पण सर्वसामान्य नाशिककरांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांना कडक सॅल्युट ठोकला. **पुन्हा आवाज केला तर याद राखा!** "यापुढे जर कोणी मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून 'हिरोगिरी' करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर याहूनही कडक आणि कठोर कारवाई होईल," असा सज्जड दम पोलिसांनी भरला आहे. त्यामुळे आता बुलेटवर 'फटाके' फोडण्याआधी या टवाळखोरांना १०० वेळा विचार करावा लागेल. ही धमाकेदार आणि ऐतिहासिक कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) श्रीमती मोनिका राऊत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सरकारवाडा विभाग) श्री. सुरवाडकर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली झाली. तर मैदानावर 'बॅटिंग' करत बुलेटस्वारांना धडा शिकवण्याची जबरदस्त कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहा. पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उप निरीक्षक भारत पाटील आणि त्यांच्या डॅशिंग टीमने (गिरीश महाले, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, गोरख साळुंखे, राकेश राऊत, घनश्याम भोये, मुकेश आहिरे, प्रवीण केदारे, नवले) करून दाखवली आहे. *तात्पर्य:*पोलिसांचा रोड-रोलर फिरला, आणि बुलेटचा आवाज 'भुर्रर्र' झाला! आता कॉलेज रोडवर फक्त शांतता... आणि टवाळखोरांच्या मनात पोलिसांची दहशत!3
- Post by Shravan Deore2
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2