राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे प्रथमच येवला दौऱ्यावर आले असता, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या संपर्क कार्यालयात गावप्रमुख, बूथप्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांची विस्तृत आढावा बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, नवीन सदस्य नोंदणी, पक्षविस्तार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी दिलीप अण्णा खैरे यांच्या सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतच्या संघर्षमय, जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले की, आपण जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असलो तरी त्यामागे मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी दाखविलेला विश्वास आणि येवला मतदारसंघात काम करण्याची मिळालेली संधी हेच खरे बळ आहे. येवल्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच वरिष्ठ नेतृत्वाने ही मोठी जबाबदारी सोपविली असल्याचे त्यांनी नमूद केले. खैरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वाढली असली तरी येवल्यात दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार, आढावा बैठक आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व्यासपीठ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ते स्वतः प्रत्येक मंगळवारी येवल्यात उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावतीताई पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, बाळासाहेब कर्डक, युवा नेते संभाजी पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम, संजय बनकर, ३८ गाव पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सचिन कळमकर, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, निसार निंबुवाले, बाळासाहेब पिंपरकर, एल. जी. कदम, पी. के. काळे, आर. डी. खैरनार, कांतीलाल साळवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, विनायक भोरकडे, भाजप नेते प्रमोद सस्कर, डॉ. श्रीकांत आवारे, साहेबराव आहेर, ज्ञानेश्वर दराडे, डॉ. मोहन शेलार, योगेश निसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावपातळीपासून बूथपातळीपर्यंत प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. दिलीप अण्णा खैरे यांच्या पहिल्याच येवला दौऱ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांमधील प्रचंड उत्साह पाहता, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे प्रथमच येवला दौऱ्यावर आले असता, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या संपर्क कार्यालयात गावप्रमुख, बूथप्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांची विस्तृत आढावा बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, नवीन सदस्य नोंदणी, पक्षविस्तार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी दिलीप अण्णा खैरे यांच्या सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतच्या संघर्षमय, जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले की, आपण जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असलो तरी त्यामागे मंत्री छगन भुजबळ
साहेब यांनी दाखविलेला विश्वास आणि येवला मतदारसंघात काम करण्याची मिळालेली संधी हेच खरे बळ आहे. येवल्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच वरिष्ठ नेतृत्वाने ही मोठी जबाबदारी सोपविली असल्याचे त्यांनी नमूद केले. खैरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वाढली असली तरी येवल्यात दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार, आढावा बैठक आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व्यासपीठ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ते स्वतः प्रत्येक मंगळवारी येवल्यात उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावतीताई पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, बाळासाहेब कर्डक, युवा नेते संभाजी पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम, संजय बनकर, ३८ गाव पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सचिन
कळमकर, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, निसार निंबुवाले, बाळासाहेब पिंपरकर, एल. जी. कदम, पी. के. काळे, आर. डी. खैरनार, कांतीलाल साळवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, विनायक भोरकडे, भाजप नेते प्रमोद सस्कर, डॉ. श्रीकांत आवारे, साहेबराव आहेर, ज्ञानेश्वर दराडे, डॉ. मोहन शेलार, योगेश निसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावपातळीपासून बूथपातळीपर्यंत प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. दिलीप अण्णा खैरे यांच्या पहिल्याच येवला दौऱ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांमधील प्रचंड उत्साह पाहता, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
- एका लहान मुलाने टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू तयार करत आपले अद्भुत 'जुगाड' कौशल्य दाखवले आहे. ही घटना लहान मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीचे आणि सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे, जिथे निरुपयोगी वस्तूंनाही उपयुक्त रूप दिले जाते.1
- आमच्या घराजवळ एक खड्डा असून, तो बुजवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.1
- दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात. चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.1
- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील सुसरवाडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत दिनांक २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली आणि योगासनांचे आरोग्यासाठी असलेले फायदे सविस्तरपणे समजून घेतले. या उपक्रमासाठी क्रीडा शिक्षक श्री. रामा पोकळा सर यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.2
- नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २१ परीक्षा केंद्रांवर जिल्हा पोलिसांसह सीआयआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी ४५ वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व नियमित प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, सुरक्षा व गोपनीयतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.1
- सध्याच्या यांत्रिक युगात, जिथे अनेक लहान मुले मोबाईलमध्ये व्यस्त असतात, तिथे वाडा येथील एका मुलाने मोबाईलच्या या दुनियेतून बाहेर पडून आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत एक सुंदर आणि आधुनिक यंत्र तयार केले आहे. या अनोख्या यंत्राचा उपयोग गाडी धुण्यासह विविध कामांसाठी करता येतो. या मुलाच्या नवनिर्मितीमधून हे अधोरेखित होते की, लहान मुलांना फक्त मोबाईलमध्ये गुंतवून न ठेवता, त्यांच्यातील कल्पनाशक्तीला वाव देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते असे सृजनशील आणि उपयुक्त शोध लावू शकतील.1
- येवला तालुका काँग्रेस कमिटीने विरोधी पक्षनेते खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण विभाग) जिल्हाध्यक्ष मा. श्री. भरतभाऊ टाकेकर होते, तर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खळसे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अॅड. समीर यादवराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील व परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना 'प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविण्यात आले. यामध्ये असिस्टंट डायरेक्टर (ग्रेड-१) पदी निवड झालेले शुभम विजय बोराळे आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ९६.१४% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेली भक्ती सुनील थोरकुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोधळी, शुकदेव मडवई, बळीराम शिंदे, अॅड. नाना शिंदे, रेहान पठाण, अरमान शेख यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, फ्रंटल विभाग व सेलचे सदस्य, तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.3