गुरूवार दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी ओतूरहून मुंबईला येताना नेहमीप्रमाणे टोकावडे - सरळगाव दरम्यान असलेल्या 'हाॅटेल समाधान' येथे जेवणासाठी थांबलो होतो. हाॅटेलमध्ये गेल्यागेल्याच तिथल्या वेटरने आम्हाला एका बाजूला बसण्याची विनंती केली म्हणून चौकशी केली असता चैतन्य विद्यालय, ओतूरचे सहलीला गेलेले विद्यार्थी जेवणासाठी थांबणार आहेत असे समजले. आपल्या पिढीला शालेय सहलीचा असा आनंद कधी अनुभवायला मिळाला नाही, त्यामुळे मला जरा नवल वाटले. खरंतर सहल व्यवस्थापक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी केलेली 'हाॅटेल समाधान' ही निवड अतिशय योग्य होती. प्रशस्त बैठक व्यवस्था, जेवणाची उत्तम सोय असलेल्या समाधान हाॅटेलमध्ये किल्ल्यासारखी भिंत आणि त्यावरील भलेमोठे बैलगाडा शर्यतीचे आकर्षक पोस्टर, काऊंटरवरील दोन रूबाबदार बैलजोड्या आपल्याला शिवजन्मभूमी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याची ओळख करून देतात. मूळचे मंचरजवळील कळंब गावचे असलेले श्री. उमेश भालेराव यांनी काहीशा निर्जन स्थळी हा हाॅटेल व्यवसाय सुरू करून चांगलाच जम बसवला आहे. माळशेज घाट ते कल्याण मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हाॅटेल समाधान सध्यातरी श्रमपरिहारासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. अशा ठिकाणी पाचवी ते सातवीतील २०७ विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि १६ शिक्षकांची एकाच वेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दोन दिवसांच्या मुंबई दर्शन आणि ठाणे येथील टिकुजी-नी-वाडी मनोरंजन पार्कला मनसोक्त आनंद लुटत परतीच्या मार्गावर असलेल्या विद्यार्थ्यांनी हाॅटेल समाधान येथे आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आपल्या शालेय जीवनातील सहली एवढ्या दूरवर जातच नव्हत्या तर अशा हाॅटेलमध्ये जेवणाचा योग कुठून येणार.! साभार : Sanjay Nalawade

- प्रत्येकाने शिकवलं🙌 vichardrushti #manphulpakharu मराठी #marathishayri #marathireel #marathithoughts #marathilekhak #marathibhasha #marathi #trending reels1
- My first shoot 🤗 BRIDAL MAKEUP 🌹 Waheguru mehar kre 🙏🏼1
- The newest addition to yohanpoonawalla’s ever growing fleet is this stunning Rolls-Royce Phantom Series II Extended Finished in a regal shade of Bohemian Red, this particular Phantom is a special commission with the Privacy Suite that adds a glass partition between the driver and the rear passengers for added privacy Fun fact, the Privacy Suite option was recently withdrawn for the Phantom by Rolls-Royce and this particular car was built with the partition on special request Believed to be the last such example of the Phantom, this thing reeks class as it rolls with a Defender in tow RollsRoyce #Phantom #SeriesII #YZP #YZPCollection #V12 #BohemianRed #Pune via shot_by_kunal_1
- दैवत…🙇🏻♂️🌍1
- दुर्गाष्टमी🌺🙏🏻1
- Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच | Marathi News1