logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. माधव कदम यांनी एकाग्रता, भावनिक नियंत्रण आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी योगाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय प्राचीन संस्कृतीत योग, योगासने आणि योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग म्हणजे तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम असून, आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवून मनावरही चांगले संस्कार करता येतात. नियमित व्यायाम आणि योगासने रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, असे सांगत त्यांनी सर्वांना योगाचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. अभिजीत फुलबांधे यांनी उपस्थितांना अनुलोम-विलोम क्रियेसह शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याचे मार्गदर्शन करून सर्वांकडून प्राणायाम आणि योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या पुढाकाराने हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. नवीन जांभेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. त्रिरत्न भगत, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन प्रा. संतोष पाचकुडके, प्रा. डॉ. विठ्ठल जीवतोडे, प्रा. डॉ. प्रफुल्ल शिरभाते, प्रा. अशोक सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना आणि महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

1 hr ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago
e80155dc-2f45-49bf-85ea-6dfd35bb7001

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.
    1
    गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    1
    हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
    1
    खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
    user_लोकराष्ट्र न्यूज
    लोकराष्ट्र न्यूज
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या शेलगाव ग्रामपंचायतीत आजही पाण्यासाठी तीव्र टंचाई असून, गावातील कोणत्याही नागरिकाला घरपोच पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात असताना आणि गावात जलजीवन मिशनसारख्या योजनेचे काम झाले असतानाही, ही समस्या कायम आहे. पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापराच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांची अवस्था स्वातंत्र्यपूर्व काळासारखी झाली आहे. गावात नळजोडणी झालेली असली तरी, या नळांना पाणीच येत नाही. एवढेच नाही तर, गावातील हातपंप किंवा सार्वजनिक बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध नाही. गावातील काही भागांमध्ये रस्ते खाली गेले असून नाले उंच झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी स्थिती निर्माण होते. काही ठिकाणी नाल्यांची बिले उचलली गेली असली तरी, तिथे नाले बांधले गेलेले नाहीत. नामफलकावर दर्शवल्याप्रमाणे नाले जेवढ्या रस्त्यावर दाखवले आहेत, त्याच्या अर्ध्या भागातच काम झाले असून अर्धा भाग तसाच अपूर्ण आहे, असा भोंगळ कारभार या गावात दिसून येतो. ग्रामपंचायतीत कागदपत्रे काढणे असो किंवा इतर कामे असो, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील सरंपच महिन्यातून केवळ एक-दोन वेळा गावात येत असल्याने ग्रामस्थांच्या अनंत समस्या अधिकच वाढत आहेत.
    1
    नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या शेलगाव ग्रामपंचायतीत आजही पाण्यासाठी तीव्र टंचाई असून, गावातील कोणत्याही नागरिकाला घरपोच पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात असताना आणि गावात जलजीवन मिशनसारख्या योजनेचे काम झाले असतानाही, ही समस्या कायम आहे. पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापराच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांची अवस्था स्वातंत्र्यपूर्व काळासारखी झाली आहे.

गावात नळजोडणी झालेली असली तरी, या नळांना पाणीच येत नाही. एवढेच नाही तर, गावातील हातपंप किंवा सार्वजनिक बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध नाही. गावातील काही भागांमध्ये रस्ते खाली गेले असून नाले उंच झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी स्थिती निर्माण होते. काही ठिकाणी नाल्यांची बिले उचलली गेली असली तरी, तिथे नाले बांधले गेलेले नाहीत. नामफलकावर दर्शवल्याप्रमाणे नाले जेवढ्या रस्त्यावर दाखवले आहेत, त्याच्या अर्ध्या भागातच काम झाले असून अर्धा भाग तसाच अपूर्ण आहे, असा भोंगळ कारभार या गावात दिसून येतो.

ग्रामपंचायतीत कागदपत्रे काढणे असो किंवा इतर कामे असो, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील सरंपच महिन्यातून केवळ एक-दोन वेळा गावात येत असल्याने ग्रामस्थांच्या अनंत समस्या अधिकच वाढत आहेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.