स्वीकृत नगरसेवक पदांवरून सुरू असलेली राजकीय रस्सीखेच अखेर संपुष्टात कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदांवरून सुरू असलेली आठ दिवसांची राजकीय रस्सीखेच अखेर संपुष्टात आली आहे.काँग्रेस,भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी आपल्या कोट्यानुसार आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी तीन,तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत.येत्या 20 फेब्रुवारी रोजी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.नवीन नियमानुसार प्रत्येक दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे. 81 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आणि निष्ठावंतांना संधी देण्यासाठी या पदांचा वापर करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने,शहराध्यक्ष सुनील मोदी आणि सामान्य कार्यकर्ता मुस्ताफा मलबारी यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या राहुल माने यांना सतेज पाटील यांनी संधी दिल्याची चर्चा आहे.भाजपकडून जयंत पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली असून,शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे.तसेच कार्यकर्ता सुनील वाडकर यांनाही संधी देण्यात आली आहे.शिवसेनेकडून माजी नगरसेवक रत्नेश शिरोडकर आणि प्रसाद चव्हाण यांची नावे निश्चित झाली आहेत.या निवडीमुळे पराभूत उमेदवारांना दिलासा मिळाला असून,निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याची भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे.

- कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.1
- सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.1
- 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार1
- इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.1
- भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)1