logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे भीषण दुर्घटना घडली असून, आतापर्यंत तब्बल १८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. फुगेवाडी येथील एका घरातच जीवघेण्या विषारी दारूची निर्मिती केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित कर्नेलसिंग विरका, त्याची पत्नी इंदरजित विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विक्की विरका यांनी बाहेरून आणलेल्या गावठी दारूत २१५ लिटर घातक 'मिथेनॉल' रसायनाची भेसळ केल्याचे उघडकीस आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश व्हानकडे याने ही विषारी दारू शहरातील चार वेगवेगळ्या अड्ड्यांवर पोहोचवली होती. फुगेवाडी परिसरातील संजयनगरमध्ये, डेक्कन पेपर मिलजवळ कर्नेलसिंह तखतसिंह विरका उर्फ 'सरदारजी' याचे घर असून, गेल्या १५ वर्षांपासून या घरात त्याचा गावठी दारूचा गुत्ता बेकायदेशीरपणे सुरू होता. त्याची पत्नी इंदरजित हा गुत्ता चालवत असे, तर मुलगा गुरुचरण उर्फ विक्की त्यांना या कामात मदत करत होता. बाहेरून गावठी हातभट्टीची दारू आणून, त्यात घातक रसायने मिसळणे आणि घरातूनच तिची छुप्या पद्धतीने विक्री करणे असा त्यांचा बिनबोभाट कारभार सुरू होता. मंगळवारी सरदारजीने गावठी दारूचे बॅरेल आणल्यानंतर, दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी त्यात तब्बल २१५ लिटर घातक 'मिथेनॉल' (मिथील अल्कोहोल) मिसळले. हा जीवघेणा साठा तयार झाल्यानंतर योगेश व्हानकडे आणि राधेशाम प्रजापती यांनी ही दारू हडपसर तसेच पिंपरी-चिंचवडमधील चार प्रमुख दारू गुत्त्यांवर वितरित केली. ही दारू प्यायल्यानंतर ग्राहकांना तीव्र विषबाधा झाली आणि एकापाठोपाठ एक अशा १७ ते १८ जणांचा वेदनादायक मृत्यू झाला. हातभट्टीची दारू साधारणपणे कुजलेला गूळ आणि उसाच्या मळीपासून तयार केली जाते, परंतु तिची नशा वाढवण्यासाठी नवसागर, युरिया व ऑक्सिटोसिन यांसारख्या रसायनांची भेसळ केली जाते. या प्रकरणात रसायनांचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढल्याने त्याचे रूपांतर थेट 'मिथेनॉल'मध्ये झाले. तज्ज्ञांच्या मते, मिथेनॉल हे अत्यंत घातक असून ते शरीरात गेल्यावर सर्वात आधी डोळ्यांच्या नसांवर हल्ला करते, ज्यामुळे मळमळणे, उलट्या होणे, तोंडाला फेस येणे आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. मृत झालेल्या सर्व बाधितांमध्ये हीच लक्षणे आढळून आली असून, त्यांचे यकृत आणि किडनी पूर्णपणे निकामी झाली होती; अखेर श्वसनक्रिया किंवा हृदय बंद पडल्याने काही तासांतच त्यांचा मृत्यू ओढवला. फुगेवाडीतील या भीषण घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परिणामी, शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरातील गावठी दारूचे सर्व गुत्ते तात्पुरते पूर्णपणे बंद होते. तसेच, नदीकाठच्या झुडपांमध्ये चालणारे दारू गाळण्याचे अवैध अड्डेही थंडावले असून, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भीतीने दारू गाळणारे आणि विक्रेते सध्या फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

11 hrs ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
11 hrs ago
9b56e21f-20a9-46af-9052-4d1e7186a328

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    2
    या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    user_Ashraf Ahmed
    Ashraf Ahmed
    Contractor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    1
    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    1
    सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    1
    ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    1
    सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या ताजमहालला भेट देण्यासाठी पोहोचली आहे. याबाबतची माहिती BNN NEWS ने दिली.
    1
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या ताजमहालला भेट देण्यासाठी पोहोचली आहे. याबाबतची माहिती BNN NEWS ने दिली.
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    1
    सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.