logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूरमध्ये (दि २७) केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी मुनगंटीवार यांनी बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकर्षक कलाकृतीसह पुष्पगुच्छ भेट देत गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, नितीनजी गडकरी हे विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यामुळे काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते; आणि त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे नितीनजी गडकरी. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गडकरी हे केवळ रस्ते नव्हे, तर माणसे जोडणारे आहेत आणि केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास व कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. ते कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली.

2 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

नागपूरमध्ये (दि २७) केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी मुनगंटीवार यांनी बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकर्षक कलाकृतीसह पुष्पगुच्छ भेट देत गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, नितीनजी गडकरी हे विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यामुळे काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते; आणि त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे नितीनजी गडकरी. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गडकरी हे केवळ रस्ते नव्हे, तर माणसे जोडणारे आहेत आणि केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास व कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. ते कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाई यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर आधारित एक नवीन गाणं ‘कमळाबाई’वर आलं आहे.
    1
    पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाई यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर आधारित एक नवीन गाणं ‘कमळाबाई’वर आलं आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लिहिणाऱ्या हातांना शक्ती देणारी सावली म्हणजे माता रमाई. त्यांना 'दीनदलितांची आई' असे म्हटले जाते, ज्यामुळे त्या धन्य धन्य ठरल्या आहेत. स्वतः दुःखाचे डोंगर सोसून आणि अठराविश्व दारिद्र्याचा अनुभव घेत असतानाही, त्यांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एका त्यागमूर्तीचे आदर्श उदाहरण सादर केले. जगत जननी माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.
    1
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लिहिणाऱ्या हातांना शक्ती देणारी सावली म्हणजे माता रमाई. त्यांना 'दीनदलितांची आई' असे म्हटले जाते, ज्यामुळे त्या धन्य धन्य ठरल्या आहेत. स्वतः दुःखाचे डोंगर सोसून आणि अठराविश्व दारिद्र्याचा अनुभव घेत असतानाही, त्यांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एका त्यागमूर्तीचे आदर्श उदाहरण सादर केले. जगत जननी माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील संगम परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले असून, रहिवासी भागाजवळ डम्पिंग यार्ड उभारण्याच्या या प्रस्तावामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या मते, डम्पिंग यार्ड उभारल्यास परिसरात कायमस्वरूपी दुर्गंधी, कचऱ्याचे प्रदूषण आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नागरिकांनी परिसरातील दुर्गंधी व वायू प्रदूषणात वाढ, डास, माशा व भटक्या प्राण्यांचा उपद्रव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका, शाळा, घरे व निवासी वसाहतींच्या सुरक्षिततेवर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्थानिक भावना व हरकती विचारात न घेता निर्णय घेतल्याचा आरोपही प्रशासनावर केला आहे. प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी व भविष्यासोबत तडजोड करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीला पाठिंबा देत “जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही, डम्पिंग यार्ड हटवाच!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी स्वाक्षऱ्यांद्वारे आपला तीव्र विरोध नोंदवत पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे. या आंदोलनात नगरसेवक व गटनेते अनूप डाखळे, प्रीती सातपुते, विजय घोडमारे, नागोराव सातपुते, नारायण सातपुते, योगेश भिवापूरे, शेषराव कांबळे, सुभाष कोठारे, नरेश फाले, ईश्वर राऊत, मालाबाई काळमेघ, दिगंबर भाऊ सातपुते, कुसुम मेश्राम, सतीश सातपुते, प्रितेश गोडे राऊत यांच्यासह युवा वर्ग, महिला मंडळ आणि प्रभाग क्रमांक १० मधील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील संगम परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले असून, रहिवासी भागाजवळ डम्पिंग यार्ड उभारण्याच्या या प्रस्तावामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांच्या मते, डम्पिंग यार्ड उभारल्यास परिसरात कायमस्वरूपी दुर्गंधी, कचऱ्याचे प्रदूषण आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नागरिकांनी परिसरातील दुर्गंधी व वायू प्रदूषणात वाढ, डास, माशा व भटक्या प्राण्यांचा उपद्रव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका, शाळा, घरे व निवासी वसाहतींच्या सुरक्षिततेवर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्थानिक भावना व हरकती विचारात न घेता निर्णय घेतल्याचा आरोपही प्रशासनावर केला आहे.

प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी व भविष्यासोबत तडजोड करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीला पाठिंबा देत “जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही, डम्पिंग यार्ड हटवाच!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी स्वाक्षऱ्यांद्वारे आपला तीव्र विरोध नोंदवत पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे.

या आंदोलनात नगरसेवक व गटनेते अनूप डाखळे, प्रीती सातपुते, विजय घोडमारे, नागोराव सातपुते, नारायण सातपुते, योगेश भिवापूरे, शेषराव कांबळे, सुभाष कोठारे, नरेश फाले, ईश्वर राऊत, मालाबाई काळमेघ, दिगंबर भाऊ सातपुते, कुसुम मेश्राम, सतीश सातपुते, प्रितेश गोडे राऊत यांच्यासह युवा वर्ग, महिला मंडळ आणि प्रभाग क्रमांक १० मधील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कलमना ते तितुर मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याची स्थिती इतकी खराब (गंदी) असूनही, त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रस्त्याच्या या गंभीर दुर्लक्षित अवस्थेकडे संबंधित यंत्रणांकडून लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
    1
    कलमना ते तितुर मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याची स्थिती इतकी खराब (गंदी) असूनही, त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रस्त्याच्या या गंभीर दुर्लक्षित अवस्थेकडे संबंधित यंत्रणांकडून लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
    user_Nitin premdas thakre
    Nitin premdas thakre
    Pharmacist कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भिवापूर तालुक्यातील शिवापूर येथील पहन ८१ मधील सरकारी तलावातून कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात माती आणि मुरूमचे उत्खनन करून लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उमरेड येथील ले-आऊट धारक ही माती चोरून नेत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात, त्यांनी २५ मे रोजी उपविभागीय अधिकारी, उमरेड यांना एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे. निवेदनानुसार, शिवापूर पहन ८१ मधील सरकारी तलावातून सर्वे क्र. २९/११, २९/२, ३०/१, ३०/२, ३०/३, ३०/४, ५९/१, ५९/२, ५८/१, ५८/२ब, ५८/३अ, ५८/३ब, ५८/४, ३३ आणि ३४ या सर्व्हे क्रमांकातून तहसील कार्यालय तसेच लघु सिंचन पाटबंधारे विभाग उमरेड यांच्या आशीर्वादाने मागील दोन महिन्यांपासून संगनमताने दिवसाढवळ्या ट्रकमधून लाखो ब्रास माती-मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे. ही माती उमरेड तालुक्यातील खाजगी जागांवर, विशेषतः सर्वे क्र. ४९०, ४९२, ४९६, ५११, ५१२ येथे नेऊन लाखोंचा भ्रष्टाचार केला जात आहे. शेतकऱ्यांना न देता ही माती परस्पर आर्थिक व्यवहार करून ले-आऊट धारकांना विकली जात असल्याचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हण यांच्याकडे केलेल्या तक्रारीत बावनकुळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित अधिकारी, भू-माफिया, जेसीबी, पोकलेन आणि टिप्परवाले यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अवैध उत्खनन त्वरित थांबवून शासनाचा बुडालेला महसूल वसूल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
    1
    भिवापूर तालुक्यातील शिवापूर येथील पहन ८१ मधील सरकारी तलावातून कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात माती आणि मुरूमचे उत्खनन करून लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उमरेड येथील ले-आऊट धारक ही माती चोरून नेत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात, त्यांनी २५ मे रोजी उपविभागीय अधिकारी, उमरेड यांना एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

निवेदनानुसार, शिवापूर पहन ८१ मधील सरकारी तलावातून सर्वे क्र. २९/११, २९/२, ३०/१, ३०/२, ३०/३, ३०/४, ५९/१, ५९/२, ५८/१, ५८/२ब, ५८/३अ, ५८/३ब, ५८/४, ३३ आणि ३४ या सर्व्हे क्रमांकातून तहसील कार्यालय तसेच लघु सिंचन पाटबंधारे विभाग उमरेड यांच्या आशीर्वादाने मागील दोन महिन्यांपासून संगनमताने दिवसाढवळ्या ट्रकमधून लाखो ब्रास माती-मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे. ही माती उमरेड तालुक्यातील खाजगी जागांवर, विशेषतः सर्वे क्र. ४९०, ४९२, ४९६, ५११, ५१२ येथे नेऊन लाखोंचा भ्रष्टाचार केला जात आहे. शेतकऱ्यांना न देता ही माती परस्पर आर्थिक व्यवहार करून ले-आऊट धारकांना विकली जात असल्याचा आरोप आहे.

उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हण यांच्याकडे केलेल्या तक्रारीत बावनकुळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित अधिकारी, भू-माफिया, जेसीबी, पोकलेन आणि टिप्परवाले यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अवैध उत्खनन त्वरित थांबवून शासनाचा बुडालेला महसूल वसूल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिलफाटा हैदराबादमधील अंडा वाली गल्लीतील नाल्याचा 'पोलखोल' करण्यात आला आहे. समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले असून, या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
    1
    शिलफाटा हैदराबादमधील अंडा वाली गल्लीतील नाल्याचा 'पोलखोल' करण्यात आला आहे. समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले असून, या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • गडचिरोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षाने जुन्या जिल्हाध्यक्षांनाच त्यांच्या पदावर कायम ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
    1
    गडचिरोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षाने जुन्या जिल्हाध्यक्षांनाच त्यांच्या पदावर कायम ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भिवापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांचा वाढदिवस आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत वराडे, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रदीप राऊत, भिवापूर पत्रकार संघाचे सचिव अमर मोकाशी उपस्थित होते. तसेच, पत्रकार संघाचे सदस्य पंढरी हिवसे, राजेश जांभुळे, नरेंद्र ढोणे, जोग्रेद्र सरदारे आणि निशा जांभुळे हेही उपस्थित होते. साप्ताहिक मिरचीचे संपादक सुनील मैदीले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
    1
    भिवापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांचा वाढदिवस आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत वराडे, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रदीप राऊत, भिवापूर पत्रकार संघाचे सचिव अमर मोकाशी उपस्थित होते. तसेच, पत्रकार संघाचे सदस्य पंढरी हिवसे, राजेश जांभुळे, नरेंद्र ढोणे, जोग्रेद्र सरदारे आणि निशा जांभुळे हेही उपस्थित होते. साप्ताहिक मिरचीचे संपादक सुनील मैदीले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हिंदू जनजागृती सभेमध्ये पाटील यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भिवंडीला काश्मीर बनण्यास फार वेळ लागणार नाही.
    1
    हिंदू जनजागृती सभेमध्ये पाटील यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भिवंडीला काश्मीर बनण्यास फार वेळ लागणार नाही.
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.