श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा व गायक हरी मेहंदकर यांच्या भक्तीगीताचा कार्यक्रम शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा व गायक हरी मेहंदकर यांच्या भक्तीगीताचा कार्यक्रम शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व
भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची
पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
- पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक1
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by Sominath Kolhe1
- ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.2
- सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....2
- Post by Sominath Kolhe1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏1