logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ​पहिली कारवाई दिनांक २६/०८/२०२६ रोजी करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, साई सिध्दी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या श्री कोचिंग क्लासेसच्या समोरील गल्लीमध्ये पोलीस उप-निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना एक संशयित तरुण आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८ वर्षे, रा. तापकीर चाळ, साई सिध्दी चौकाजवळ, शिवशंभे गल्ली क्र.२, आंबेगाव पठार, पुणे) याच्या ताब्यात १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४१/२०२६ आर्म अॅक्ट ३(२५), सी. म.पो.अधि.कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​दुसरी कारवाई दिनांक २७/०८/२०२६ रोजी करण्यात आली. तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, कात्रज डेअरी ते सरहद्द चौक दरम्यान कात्रज डेअरीच्या भिंतीजवळ एक इसम अग्निशस्त्रासह थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६ वर्षे, रा. श्री गणेश निवास, स.नं. ३२/१०, आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४४/२०२६ आर्म अॅक्ट ३(२५), सी. म.पो.अधि.कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. ​ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २, पुणे शहर) श्री. मिलिंद मोहिते, आणि सहायक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष जाधव यांच्या सूचनांनुसार पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस उप-निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदिप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, आणि कृष्णा म्हस्के यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

2 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
604bfabc-7065-4e1f-a135-9a001e93a2e0

More news from Maharashtra and nearby areas
  • "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    1
    "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    19 min ago
  • समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली
    1
    समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    1 hr ago
  • Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा
    1
    Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
संपूर्ण व्हिडिओ पहा
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    8 hrs ago
  • केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    1
    केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप
    1
    SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार 
SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा 
आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
    1
    “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा.
रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे?
तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल.
जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
“नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे.
रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे?
तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल.
माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा.
ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    15 hrs ago
  • "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"
    1
    "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    1
    शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..!
पिंपरी-चिंचवड :
शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...
: विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड
#शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.