वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी मुलाने दिले जागतिक विक्रमचे गिफ्ट १३ वर्षीय आर्य किशोर पाटीलने घडवला इतिहास, २४ कि. मि. बटरफ्लाय प्रकारात पोहून केला जागतिक विक्रम 'इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड'ने करण्यात आले सन्मानित उरणच्या १३ वर्षीय आर्यन किशोर पाटीलने आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. धरमतर ते कासा खडक हे सागरी २४ कि. मि. अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'बटरफ्लाय' प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे. बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांबपल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरला आहे. याची नोंद 'इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड' ने घेत त्याला सन्मानीत देखील केले आहे. उरण, केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंटमेरीज हायस्कुल, उरणमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असून, तो उत्तम जलतरणपटू आहे. तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत. वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊशकले नाही. वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावें या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव करत १८ डिसेंबरला जागतिक विक्रमची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक डॉ. प्रशांत शहा यांनी याची नोंद केली आहे. अवघ्या १३ व्या वर्षी केलेल्या विक्रमबाबत बोलताना आर्य याने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर करताना रात्रीचा काळोख, समोरून येणारी जहाज, प्रचंड थंडी आणि लाटांचा मारा यातून हा विक्रम केला असल्याचे म्हटले आहे. तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमबाबत बोलताना भावना अनावर झाल्या. आपले अपुरे स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण केले असून, मला माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याने फिलेले सर्वोत्तम गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या 'बटरफ्लाय' या जलतरण प्रकारातून २४ कि. मि. अंतर पोहून जाणारा आर्य किशोर पाटील हा जगातील सवात लहान जलतरणपटू ठरला असून, याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणानी घेतली आहे. तर विक्रमनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आर्याने आपल्या विक्रमाचे श्रेय त्याचे आई, वडील आणि प्राधिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर या विक्रमसाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे त्याने आभारही व्यक्त केले आहेत.
वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी मुलाने दिले जागतिक विक्रमचे गिफ्ट १३ वर्षीय आर्य किशोर पाटीलने घडवला इतिहास, २४ कि. मि. बटरफ्लाय प्रकारात पोहून केला जागतिक विक्रम 'इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड'ने करण्यात आले सन्मानित उरणच्या १३ वर्षीय आर्यन किशोर पाटीलने आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. धरमतर ते कासा खडक हे सागरी २४ कि. मि. अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'बटरफ्लाय' प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे. बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांबपल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरला आहे. याची नोंद 'इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड' ने घेत त्याला सन्मानीत देखील केले आहे. उरण, केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंटमेरीज हायस्कुल, उरणमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असून, तो उत्तम जलतरणपटू आहे. तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत. वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊशकले नाही. वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावें या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव
करत १८ डिसेंबरला जागतिक विक्रमची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक डॉ. प्रशांत शहा यांनी याची नोंद केली आहे. अवघ्या १३ व्या वर्षी केलेल्या विक्रमबाबत बोलताना आर्य याने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर करताना रात्रीचा काळोख, समोरून येणारी जहाज, प्रचंड थंडी आणि लाटांचा मारा यातून हा विक्रम केला असल्याचे म्हटले आहे. तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमबाबत बोलताना भावना अनावर झाल्या. आपले अपुरे स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण केले असून, मला माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याने फिलेले सर्वोत्तम गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या 'बटरफ्लाय' या जलतरण प्रकारातून २४ कि. मि. अंतर पोहून जाणारा आर्य किशोर पाटील हा जगातील सवात लहान जलतरणपटू ठरला असून, याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणानी घेतली आहे. तर विक्रमनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आर्याने आपल्या विक्रमाचे श्रेय त्याचे आई, वडील आणि प्राधिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर या विक्रमसाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे त्याने आभारही व्यक्त केले आहेत.
- 🚩🚩किल्ले रायगड वरील हिरकणी बुरूजाची कथा 🚩🚩1
- गेणमाळ रायगड मधील काही आनंदाचे क्षण(9284567429)1
- श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻❤️🚩1
- किल्ले रायगड लता मंगेशकर यांनी गायलेल्या काही ओळी1
- रायगड आणि शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धंनासाठी विशेष काळजी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस1
- जे एस एस रायगड चे संचालक डॉ विजय कोकणे सन्मानित1