logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अलकनूर जवळ दुचाकी - मालवाहू ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नी व चिमुकलीचा मृत्यू जमखंडी / प्रतिनिधी  अलकनूर गावाजवळील जमखंडी–मिरज आंतरराज्य मार्गावर आज दुपारी दुचाकी व मालट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मूळचे जमखंडी येथील रहिवासी असलेले गिर्याप्पा कुद्रोळी (वय ३८) हे सध्या जयसिंगपूर येथे खासगी संस्थेत कार्यरत होते. ते पत्नी मंजुळा (वय २८) व मुलगी आराध्या (वय ७) यांच्यासह दुचाकीवरून आजारी आईची विचारपूस करण्यासाठी जमखंडीकडे जात होते. दुपारी अलकनूर गावाजवळील करीसिद्धेश्वर देवस्थान येथील वळणावर जमखंडीकडून मिरजकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.या अपघातात मंजुळा कुद्रोळी व आराध्या कुद्रोळी यांचा जागीच मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या गिर्याप्पा कुद्रोळी यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच हारुगिरी पोलीस स्थानक येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेने जमखंडी व जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून,कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी हारुगिरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

2 hrs ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
bdba16bf-f607-4b73-b170-e3442a5f3300

अलकनूर जवळ दुचाकी - मालवाहू ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नी व चिमुकलीचा मृत्यू जमखंडी / प्रतिनिधी  अलकनूर गावाजवळील जमखंडी–मिरज आंतरराज्य मार्गावर आज दुपारी दुचाकी व मालट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मूळचे जमखंडी येथील रहिवासी असलेले गिर्याप्पा कुद्रोळी (वय ३८) हे सध्या जयसिंगपूर येथे खासगी संस्थेत कार्यरत होते. ते पत्नी मंजुळा (वय २८) व मुलगी आराध्या (वय ७) यांच्यासह दुचाकीवरून आजारी आईची विचारपूस करण्यासाठी जमखंडीकडे जात होते. दुपारी अलकनूर गावाजवळील करीसिद्धेश्वर देवस्थान येथील वळणावर जमखंडीकडून मिरजकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.या अपघातात मंजुळा कुद्रोळी व आराध्या कुद्रोळी यांचा जागीच मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या गिर्याप्पा कुद्रोळी यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच हारुगिरी पोलीस स्थानक येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेने जमखंडी व जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून,कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी हारुगिरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    1
    कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    1
    सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार
    1
    🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩
१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता.
महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात.
महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे.
१९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया.
🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    1
    इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला  दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    1
    भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    1
    BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. 
#AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    1
    सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.