logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अखेर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार दलित वस्ती निधीच्या कथित काळाबाजार आणि उघड गैरव्यवहाराविरोधात आज कर्जत नगरपंचायतीमध्ये संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळाला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच निवेदन देण्यात आले होते; मात्र तरीही प्रशासन आणि जबाबदार पदाधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त आंदोलकांनी थेट नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. शासकीय नियमांनुसार दलित वस्तीचा निधी राखीव प्रभाग सोडून इतरत्र खर्च करायचा असल्यास, ५० टक्क्यांपेक्षा जास्त मागासवर्गीय लोकसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उतरत्या क्रमाने निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, कर्जत नगरपंचायतीने सामाजिक न्याय विभागाच्या या शासन निर्णयाला पूर्णपणे हरताळ फाळत निधीचे बेकायदेशीर वाटप केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. तांत्रिक मंजुरी मिळवण्यासाठी कागदपत्रांची खोटी पूर्तता करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी आणि संबंधित संस्थांच्या व्यक्तींवर तातडीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी या वेळी करण्यात आली. सकाळपासूनच नगरपंचायतीच्या आवारात हलगीच्या कडकडाटात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. संपूर्ण नगरपंचायत परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता. मात्र, सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातून मनोज जरागे हे मुबंई च्या दिशेने जात आहे यामुळे पोलिस प्रशासन सर्व त्या बंदोबस्तात असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान राखत हे आंदोलन आज तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, शिवसेना युवा नेते सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सचिन कुलथे, ओंकार तोटे, रिपाई युवक जिल्हाउपाध्यक्ष विशाल काकडे, शहराध्यक्ष सोहन कदम, अनुराग भैलुमे, सचिन धांडे, लखन भैलुमे, मिलिंद आखाडे, हमजत शेख, विशाल भैलुमे, सुमित भैलुमे, किरण भैलुमे, भाऊसाहेब भैलुमे, चंद्रकांत कांबळे, बाळासाहेब चिंदे, दादू माने, प्रकाश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभागाचे सभापती भास्कर भैलुमे म्हणाले, प्रशासनाने सर्व नियमांची पायमल्ली करून दलित वस्तीच्या निधीचा उघड गैरवापर केला आहे. आज केवळ पोलिसांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित केले आहे. जर यावर तात्काळ योग्य ती कारवाई झाली नाही, तर पुढील आठवड्यात नगरपंचायतीला तीव्र स्वरूपाचे 'टाळे ठोक आंदोलन' छेडले जाईल.

17 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
17 hrs ago
89a6a7f0-9d88-4455-a303-e893710f12ca

अखेर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार दलित वस्ती निधीच्या कथित काळाबाजार आणि उघड गैरव्यवहाराविरोधात आज कर्जत नगरपंचायतीमध्ये संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळाला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच निवेदन देण्यात आले होते; मात्र तरीही प्रशासन आणि जबाबदार पदाधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त आंदोलकांनी थेट नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. शासकीय नियमांनुसार दलित वस्तीचा निधी राखीव प्रभाग सोडून इतरत्र खर्च करायचा असल्यास, ५० टक्क्यांपेक्षा जास्त मागासवर्गीय लोकसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उतरत्या क्रमाने निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, कर्जत नगरपंचायतीने सामाजिक न्याय विभागाच्या या शासन निर्णयाला पूर्णपणे हरताळ फाळत निधीचे बेकायदेशीर वाटप केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. तांत्रिक मंजुरी मिळवण्यासाठी कागदपत्रांची खोटी पूर्तता करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी आणि संबंधित संस्थांच्या व्यक्तींवर तातडीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी या वेळी करण्यात आली. सकाळपासूनच नगरपंचायतीच्या आवारात हलगीच्या कडकडाटात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. संपूर्ण नगरपंचायत परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता. मात्र, सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातून मनोज जरागे हे मुबंई च्या दिशेने जात आहे यामुळे पोलिस प्रशासन सर्व त्या बंदोबस्तात असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान राखत हे आंदोलन आज तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, शिवसेना युवा नेते सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सचिन कुलथे, ओंकार तोटे, रिपाई युवक जिल्हाउपाध्यक्ष विशाल काकडे, शहराध्यक्ष सोहन कदम, अनुराग भैलुमे, सचिन धांडे, लखन भैलुमे, मिलिंद आखाडे, हमजत शेख, विशाल भैलुमे, सुमित भैलुमे, किरण भैलुमे, भाऊसाहेब भैलुमे, चंद्रकांत कांबळे, बाळासाहेब चिंदे, दादू माने, प्रकाश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभागाचे सभापती भास्कर भैलुमे म्हणाले, प्रशासनाने सर्व नियमांची पायमल्ली करून दलित वस्तीच्या निधीचा उघड गैरवापर केला आहे. आज केवळ पोलिसांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित केले आहे. जर यावर तात्काळ योग्य ती कारवाई झाली नाही, तर पुढील आठवड्यात नगरपंचायतीला तीव्र स्वरूपाचे 'टाळे ठोक आंदोलन' छेडले जाईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पत्रकारांच्या हक्कां साठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजान नियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    पत्रकारांच्या हक्कां साठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजान 
नियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार
बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.        
शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित बीड | प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार विजय सिंह पंडित यांनी केले आहे. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा मार्ग काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून आपण या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, पुढेही करत राहणार असल्याचे आ. विजय सिंह पंडित यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “मनोज दादा जरांगे यांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मोठा संघर्ष उभा केला आहे. मात्र, त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक मार्ग सरकारच्या माध्यमातून काढण्याची भूमिका सरकारची आहे. सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि पुढेही करीत राहणार आहे.” मराठा समाजाच्या भावना आणि आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील असून, संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणे आवश्यक आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवादातून योग्य मार्ग काढण्यासाठी आपण आपली भूमिका बजावत राहू, असेही आ. पंडित यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित
मनोज दादा जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी; सरकारच्या माध्यमातून मागण्यांचा मार्ग काढण्याची भूमिका – आ. विजय सिंह पंडित
बीड | प्रतिनिधी :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार विजय सिंह पंडित यांनी केले आहे. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा मार्ग काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून आपण या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, पुढेही करत राहणार असल्याचे आ. विजय सिंह पंडित यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, “मनोज दादा जरांगे यांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मोठा संघर्ष उभा केला आहे. मात्र, त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक मार्ग सरकारच्या माध्यमातून काढण्याची भूमिका सरकारची आहे. सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि पुढेही करीत राहणार आहे.”
मराठा समाजाच्या भावना आणि आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील असून, संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणे आवश्यक आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवादातून योग्य मार्ग काढण्यासाठी आपण आपली भूमिका बजावत राहू, असेही आ. पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका!
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.
    3
    वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
नमस्कार 
क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड,
आयुक्त साहेब यांस,
16 Sept 2026
नमस्कार..
विषय .
वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे.
कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. 
अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत.
माझा पत्ता...
पोतनीस, 
51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ.
पुणे 411041.
    user_Nilesh Balkrishna Potnis
    Nilesh Balkrishna Potnis
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    53 min ago
  • गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…
    1
    गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    1
    "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    11 hrs ago
  • देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...
    1
    देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज, अनेक ठिकानी होनार स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज बीड | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वागतासाठी विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, मराठा समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागत फलक, बॅनर आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे बीड शहरात ‘जरांगे पाटील यांच्या स्वागताचा जल्लोष’ पाहायला मिळणार असून, त्यांच्या विचारांना आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडूनही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. बीड नगरीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला पोहोचला असून, त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    2
    मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज,  अनेक ठिकानी होनार स्वागत
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज
बीड | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वागतासाठी विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, मराठा समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागत फलक, बॅनर आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून नियोजन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे बीड शहरात ‘जरांगे पाटील यांच्या स्वागताचा जल्लोष’ पाहायला मिळणार असून, त्यांच्या विचारांना आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडूनही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
बीड नगरीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला पोहोचला असून, त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये. मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!
    1
    मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil
तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये.
मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.