“भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, उलट आवाज उठवणाऱ्यांवर दबाव?” “मनपातील ‘मलई’ वाचवण्यासाठी कारवाई? सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट!” पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन तसेच दबावतंत्र वापरणाऱ्या काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या हालचालींमुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर “लोकशाही धोक्यात येतेय का?” असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सुरक्षा विभाग कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत दि. १३/०४/२०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, विविध विभागांकडे वारंवार तक्रारी करून प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची एकत्रित माहिती गोळा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात खालील व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत: श्री. रविकेश अभिमान सावंत – अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था, रा. स. नं. २१/९, शाहू कॉलनी, नांदेड गाव, सिंहगड रोड, पुणे-४११०४१ श्री. सुनील जयवंतराव पवार – अध्यक्ष, राष्ट्रीय एकता सदभावना प्रतिष्ठान, महाराष्ट्र एनजीओ श्री. उमेर शेख – पुणे शहर अध्यक्ष, अल्पसंख्याक राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय राजकीय पक्ष) श्री. शंकर किन्नु ठाकूर – वार्ताहर व पत्रकार, इंडियन टाइम्स रिव्ह्यू, शॉप नं. ११, BMC मार्केट, पोलिस बीट मागे, गेट नं. ७, मालवणी, मलाड वेस्ट, मुंबई-४०००९५ श्री. राजेंद्र विलास जाधवर – पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय राजकीय पक्ष) कु. नागुबाई उर्फ मीनाताई सिद्धप्पा धोत्रे – अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग विकास फाउंडेशन श्रीमती कविता पटेकर – रा. प्रगती अपार्टमेंट, इशा मजला, फ्लॅट, मांजरी बुद्रुक, कात्रज, पुणे श्री. रमेश विष्णू खामकर – पुणे मनपाकडील सेवेनिवृत्त सेवक, रा. २६४, नारायण पेठ, पुणे-३० (मो. नं. ९८२२९६९६१०) श्री. मिलिंद जाधव – (TV9) पत्रानुसार, वरील व्यक्तींनी विविध विभागांकडे वारंवार तक्रारी करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या तक्रारींच्या प्रती व त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल २४ तासांत सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई राकेश विटेकर (सुरक्षा अधिकारी, पुणे महानगरपालिका) आणि आशा राऊत (उप आयुक्त, सुरक्षा विभाग, समन्वय, पुणे महानगरपालिका) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींवरून सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून “सामाजिक कार्यकर्त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही जणांनी याला “लोकशाहीवर गदा” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रशासन मात्र “कामकाजात अडथळे टाळण्यासाठी आवश्यक पाऊल” असल्याचे सांगत आहे. या प्रकरणामुळे पुण्यात प्रशासन विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, उलट आवाज उठवणाऱ्यांवर दबाव?” “मनपातील ‘मलई’ वाचवण्यासाठी कारवाई? सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट!” पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन तसेच दबावतंत्र वापरणाऱ्या काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या हालचालींमुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर “लोकशाही धोक्यात येतेय का?” असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सुरक्षा विभाग कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत दि. १३/०४/२०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, विविध विभागांकडे वारंवार तक्रारी करून प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची एकत्रित माहिती गोळा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात खालील व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत: श्री. रविकेश अभिमान सावंत – अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था, रा. स. नं. २१/९, शाहू कॉलनी, नांदेड
गाव, सिंहगड रोड, पुणे-४११०४१ श्री. सुनील जयवंतराव पवार – अध्यक्ष, राष्ट्रीय एकता सदभावना प्रतिष्ठान, महाराष्ट्र एनजीओ श्री. उमेर शेख – पुणे शहर अध्यक्ष, अल्पसंख्याक राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय राजकीय पक्ष) श्री. शंकर किन्नु ठाकूर – वार्ताहर व पत्रकार, इंडियन टाइम्स रिव्ह्यू, शॉप नं. ११, BMC मार्केट, पोलिस बीट मागे, गेट नं. ७, मालवणी, मलाड वेस्ट, मुंबई-४०००९५ श्री. राजेंद्र विलास जाधवर – पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय राजकीय पक्ष) कु. नागुबाई उर्फ मीनाताई सिद्धप्पा धोत्रे – अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग विकास फाउंडेशन श्रीमती कविता पटेकर – रा. प्रगती अपार्टमेंट, इशा मजला, फ्लॅट, मांजरी बुद्रुक, कात्रज, पुणे श्री. रमेश विष्णू खामकर – पुणे मनपाकडील सेवेनिवृत्त सेवक, रा. २६४, नारायण पेठ, पुणे-३० (मो. नं. ९८२२९६९६१०) श्री. मिलिंद जाधव – (TV9) पत्रानुसार, वरील व्यक्तींनी विविध विभागांकडे वारंवार
तक्रारी करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या तक्रारींच्या प्रती व त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल २४ तासांत सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई राकेश विटेकर (सुरक्षा अधिकारी, पुणे महानगरपालिका) आणि आशा राऊत (उप आयुक्त, सुरक्षा विभाग, समन्वय, पुणे महानगरपालिका) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींवरून सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून “सामाजिक कार्यकर्त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही जणांनी याला “लोकशाहीवर गदा” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रशासन मात्र “कामकाजात अडथळे टाळण्यासाठी आवश्यक पाऊल” असल्याचे सांगत आहे. या प्रकरणामुळे पुण्यात प्रशासन विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता... #पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज #PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews1