जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय, सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संस्था प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनीही दोन्ही महापुरुषांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर खमाठ यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त केली. शाळेचे प्रभारी प्राचार्य जीवन कोलते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्याच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला जगण्याची प्रेरणा दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्या शाहिरीने जनजागृतीचे मोठे कार्य केले. 'जग बदलू घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव' हा त्यांचा संदेश आजही समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी आहे." यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या त्यांच्या घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या राष्ट्रसेवेचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिक्षक विकास पाटील, भास्कर खमाठ, मुकुंद व्यवहारे, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, दिलीप सिसोदे, मनोहर पडोळ, गणेश मोहने, सुनील चव्हाण, दिलीप कोळी, गणेश सत्रे, योगेश राठोड, प्रदीप पाटील, मोहन बोरे, सतीश खवले, शिवाजी सत्रे, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, गजानन चव्हाण, संदीप कोलते तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाबाबतची माहिती राहुल बडक यांनी दिली.

- 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण1
- ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..! कमलकीशोर जोगदंडे भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले. Bharat 24taas News1
- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- *पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील एक तरुण नालायच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे....*1