logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार! खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव. ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार! खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खालचे भोमाळे येथे मुसळधार पावसात ताडपत्रीचा आडोसा करून अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खालचे भोमाळे येथे एका व्यक्तीच्या निधनानंतर मुसळधार पावसात ग्रामस्थांनी ताडपत्री धरून अंत्यसंस्कार पूर्ण केले. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खालचे भोमाळे, कारकुडी, शेंदुर्ली, येळवळीसह अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीवर संरक्षणात्मक शेड नाही. अनेक गावांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी जागेचे वाद, प्रशासकीय दिरंगाई आणि अपूर्ण कामांमुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे

1 day ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 day ago
f5095d58-0291-485e-bd12-be3759a6c2aa

ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार! खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव. ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार! खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खालचे भोमाळे येथे मुसळधार पावसात ताडपत्रीचा आडोसा करून अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खालचे भोमाळे येथे एका व्यक्तीच्या निधनानंतर मुसळधार पावसात ग्रामस्थांनी ताडपत्री धरून अंत्यसंस्कार पूर्ण केले. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खालचे भोमाळे, कारकुडी, शेंदुर्ली, येळवळीसह अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीवर संरक्षणात्मक शेड नाही. अनेक गावांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी जागेचे वाद, प्रशासकीय दिरंगाई आणि अपूर्ण कामांमुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे

More news from Jalna and nearby areas
  • भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News
    1
    भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल
भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे...
Bharat 24Taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    14 min ago
  • 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
    1
    🚨 MD ड्रग्ज जप्त!
२ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 
जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे.
या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली.
जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
    user_Police chaufer news
    Police chaufer news
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    1
    भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    18 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी*
जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे.
यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_KRUSHNA RAJPUT
    KRUSHNA RAJPUT
    जामनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • *पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील एक तरुण नालायच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे....*
    1
    *पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील एक तरुण नालायच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे....*
    user_KRUSHNA RAJPUT
    KRUSHNA RAJPUT
    जामनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.