अंबरनाथमधील 'ते' १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर अशी आघाडी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तर काँग्रेसनेहीभाजपासोबत आघाडीचा निर्णय घेणारे स्थानिक नेते प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आता काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांनी थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान, या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या अंबरनाथमधील नगरसेवकांमध्ये अंबरनाथमधील स्थानिक नेते प्रदीप नाना पाटील यांचाही समावेश आहे. प्रदीप पाटील यांच्यासह दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रदीप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्यांच्यासह या १२ नगरसेवकांनी निलंबनाच्या कारवाईनंतर थेट भाजपामध्ये प्रवेश करणं हा अंबरनाथमधील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Post by Vls Patil1
- Imtiaz Jaleel पर जानलेवा हमला,Faisal-Ayyub ने दिया जवाब1
- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- नारायण कुचे यांचे जाहीर सभा1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त1
- मालवण पाण्यामध्ये किल्ला (सिंधुदुर्ग)1
- सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत1
- तलवारीचा धाक गुंड यांची मस्ती रोहित पवारांचा घनाघात2