जि. प. सभापती पदासाठीही भाजपा-राष्ट्रवादी फिफ्टी-फिफ्टी बिनविरोध निवडी; बांधकाम समितीवर घोडे अडले ? लातूर: आज लातूर जिल्हा परिषदेतील ४ विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली. चारपैकी दोन सभापती पद हे भाजपाला तर दोन सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजपा व राष्ट्रवादी युती आहे. मात्र यात बांधकाम सभापती पद कोणाला द्यायचे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात रस्सीखेच दिसून येत आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीस स्पष्ट बहुमत आहे. यापूर्वीच अध्यक्ष भाजपाचा व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवड झालेली आहे. आज ४ विषय समिती सभापती पदासाठी पिठासीन अधिकारी रोहिणी नन्हे यांच्या उपस्थितीत जि. प. च्या नवनिर्वाचीत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेनंतर समाजकल्याण सभापती म्हणून शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव संभाजी माने यांची, खरोळा, ता. रेणापूर गटातून निवडून आलेल्या भाजपाच्या शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. विषय समिती क्र. १ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तोगरी, ता. उदगीर गटातून निवडून आलेले ज्ञानेश्वर हरिभाऊ बिरादार यांची तर विषय समिती सभापती क्र. २ साठी सरवडी, ता. निलंगा (औसा विधानसभा मतदार संघ) येथून भाजपाच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या सो. कविता किशन गोरे यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या चारही पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिये दरम्यान काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. घोषणा होताच दोन्ही पक्षाच्या या नूतन सभापतीच्या समर्थकांनी तसेच भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. बांधकाम सभापती पदावरून अडले जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण समिती सभापती साठी निवडी झाल्या. मात्र, उर्वरीत दोन समिती समिती क्र. १ व समिती क्र. २ असे संबोधून निवड करण्यात आली. अध्यक्ष या दोन्ही समितीच्या सभापतीकडे कोणते विभाग सोपवितात याची उत्सूकता आहे. भाजपाच्या वतीने विशेष करून औशाचे आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून बांधकाम समिती सभापती पद हे कविता किशन गोरे यांना द्यावे असे आग्रह आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील बांधकाम समिती सभापती पदासाठी आग्रही असून ते बांधकाम समिती सभापती पद ज्ञानेश्वर बिराजदार यांना द्यावे यासाठी आग्रही आहेत. या दोन्ही समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी या दोन समितीच्या सभापती पदाच्या खाते वाटपासाठी तीन ते चार दिवस लागतील व त्यानंतरच बांधकाम सभापती पद कोणाकडे हे निश्चीत होईल. जिल्हा परिषदेत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती असली तरी जि. प. च्या बांधकाम समिती पदावरून या दोन्ही पक्षात ताणाताणी होत असल्याचे जाणवत आहे.

- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1