logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

18 hrs ago
user_नव दर्पण
नव दर्पण
Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
18 hrs ago

धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन; कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम. तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन ...... तळोदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम.... अध्यापक शिक्षण मंडळ धुळे नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष सौ मंगलाताई महाजन व संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन यांच्या प्रेरणेतून येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो.हू. महाजन व शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट पथकाने शहर व परिसरातील श्री ची स्थापना केलेल्या विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलनाच्या उपक्रम राबविण्यात आला स्काऊट शिक्षक संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शहर व परिसरातील विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलन केले श्रीच्या उत्सवात निर्माल्या मुळे विहीर, नदी,तलाव यांचे पाणी दूषित होऊ नये त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला तसेच संकलित केलेले निर्मल्य गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ प्रकल्प केंद्राला सुपूर्द करण्यात आले हा उपक्रम बाबत शाळेचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ .सौ. शितल महाजन उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी व पी.आर.वळवी यांनी कौतुक केले आहे. तसेच अशी उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.
    1
    तळोदा शहरात गणेश मंडळाकडून 
स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन; कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम.
तळोदा शहरात गणेश मंडळाकडून 
स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन ......
तळोदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम.... 
अध्यापक शिक्षण मंडळ धुळे नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष सौ मंगलाताई महाजन व संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे संचालक  अरुणकुमार महाजन यांच्या प्रेरणेतून येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो.हू. महाजन व शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट  पथकाने शहर व परिसरातील श्री ची स्थापना केलेल्या विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलनाच्या उपक्रम राबविण्यात आला स्काऊट शिक्षक संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शहर व परिसरातील विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलन केले श्रीच्या उत्सवात निर्माल्या मुळे विहीर, नदी,तलाव यांचे पाणी दूषित होऊ नये त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला तसेच संकलित केलेले निर्मल्य  गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ प्रकल्प केंद्राला सुपूर्द करण्यात आले हा उपक्रम बाबत शाळेचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ .सौ. शितल महाजन उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी व पी.आर.वळवी  यांनी कौतुक केले आहे. तसेच अशी उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    17 min ago
  • सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    1
    सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    4
    एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले.  बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली.
सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    1
    विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    1
    पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान

अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान
अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    1
    न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
 नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    1 hr ago
  • जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात Ancr - जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    1
    जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात 
Ancr - जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • अक्कलकुवा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीची मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे सीईओंना निवेदन अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था.. रस्त्यांची दुरुस्ती करत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी.. भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन... अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने, त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने, संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.
    1
    अक्कलकुवा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीची मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे सीईओंना निवेदन
अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था.. 
रस्त्यांची दुरुस्ती करत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी.. 
भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन...
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने, त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने, संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला
    1
    छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ
तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.