logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे 'वनमहोत्सव : एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, खामगाव तसेच बुलढाणा वन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक) व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (सामाजिक वनीकरण) खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही वृक्ष दिंडी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक) पासून ते शहर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली. या दरम्यान संपूर्ण परिसर 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा विविध पर्यावरण संवर्धनाशी संबंधित घोषणांनी दुमदुमून गेला होता. वृक्ष दिंडीनंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम बुलढाणा वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख (भा.व.से.) आणि सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) व्ही. एम. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रसंगी खामगावचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार, सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) यू. आर. राऊत, शाळेचे प्राचार्य मुळे, ठेंगझोडे, पडघान, मोहाने, वनपाल श्रीनाथ, वनपाल सोनुने, वाडेकर, वनरक्षक कु. केंद्रे, कु. जोशी, कु. चव्हाण, कु. अंबुलकर, वनरक्षक शिंदे, मोरे, खोलगडे, जुमडे, आढाव, कुलट, तायडे, धारपवार, फड आणि वनसेवक रोहिदास, मिलिंद, राहुल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षिका सौ. वृषाली मोहाने यांनी वृक्ष लागवड ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांनी वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, पर्जन्यमान वाढण्यास मदत होते आणि शुद्ध प्राणवायू उपलब्ध होतो, असे सांगून खामगाव वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी आपल्या वाढदिवशी किंवा इतर विशेष प्रसंगी किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

5 hrs ago
user_Sachin boharpi
Sachin boharpi
Photographer खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
5 hrs ago
cdb810f3-075b-48fb-aba0-9726d62ba4d5

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे 'वनमहोत्सव : एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, खामगाव तसेच बुलढाणा वन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक) व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (सामाजिक वनीकरण) खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही वृक्ष दिंडी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक) पासून ते शहर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली. या दरम्यान संपूर्ण परिसर 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा विविध पर्यावरण संवर्धनाशी संबंधित घोषणांनी दुमदुमून गेला होता. वृक्ष दिंडीनंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम बुलढाणा वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख (भा.व.से.) आणि सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) व्ही. एम. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रसंगी खामगावचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार, सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) यू. आर. राऊत, शाळेचे प्राचार्य मुळे, ठेंगझोडे, पडघान, मोहाने, वनपाल श्रीनाथ, वनपाल सोनुने, वाडेकर, वनरक्षक कु. केंद्रे, कु. जोशी, कु. चव्हाण, कु. अंबुलकर, वनरक्षक शिंदे, मोरे, खोलगडे, जुमडे, आढाव, कुलट, तायडे, धारपवार, फड आणि वनसेवक रोहिदास, मिलिंद, राहुल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षिका सौ. वृषाली मोहाने यांनी वृक्ष लागवड ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांनी वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, पर्जन्यमान वाढण्यास मदत होते आणि शुद्ध प्राणवायू उपलब्ध होतो, असे सांगून खामगाव वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी आपल्या वाढदिवशी किंवा इतर विशेष प्रसंगी किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देशपातळीवरील 'नीट' आणि राज्यातील 'टीईटी' परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया' बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनाचा भाग म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर्स फाडून आपला तीव्र आक्रोश व निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एसएफआय विद्यार्थी संघटनेने पेपरफुटीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एस.एफ.आय. राज्य कमिटी सदस्य रितेश चोपडे आणि जिल्हा सचिव आदित्य इंगळे यांनी केले. या तीव्र निदर्शन आंदोलनात जिल्हा कमिटी सदस्य प्रवीण वाकुडकर, सुनील चोपडे, आनंदा थोरात, प्रथमेश आडोळकर, किशोर इंगळे यांच्यासह गिरीश उमाळे, योगेश सोनवणे, शुभम मुंडे आणि इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला।
    4
    देशपातळीवरील 'नीट' आणि राज्यातील 'टीईटी' परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया' बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

आंदोलनाचा भाग म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर्स फाडून आपला तीव्र आक्रोश व निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एसएफआय विद्यार्थी संघटनेने पेपरफुटीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एस.एफ.आय. राज्य कमिटी सदस्य रितेश चोपडे आणि जिल्हा सचिव आदित्य इंगळे यांनी केले.

या तीव्र निदर्शन आंदोलनात जिल्हा कमिटी सदस्य प्रवीण वाकुडकर, सुनील चोपडे, आनंदा थोरात, प्रथमेश आडोळकर, किशोर इंगळे यांच्यासह गिरीश उमाळे, योगेश सोनवणे, शुभम मुंडे आणि इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला।
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    35 min ago
  • बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
    1
    बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोला जिल्ह्यातील पातुर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वतः काढलेले एक चित्र सादर करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांना अभिवादन करत, प्रत्येकाचे विचार हे स्वामी विवेकानंद यांच्यासारखेच असायला हवेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहें।
    1
    अकोला जिल्ह्यातील पातुर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वतः काढलेले एक चित्र सादर करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांना अभिवादन करत, प्रत्येकाचे विचार हे स्वामी विवेकानंद यांच्यासारखेच असायला हवेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहें।
    user_Vivek nimkande
    Vivek nimkande
    Artist पातूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी जालना आणि मध्यप्रदेशातील दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस बियाण्यांचा पर्दाफाश करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर थेट एफआयआर (FIR) नोंदवून कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
    1
    बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी जालना आणि मध्यप्रदेशातील दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस बियाण्यांचा पर्दाफाश करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर थेट एफआयआर (FIR) नोंदवून कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अकोला येथील प्रभाग क्रमांक ११ कागझिपुरा मधील नागरिकांना गेल्या १० वर्षांपासून भेडसावणाऱ्या विविध त्रासांपासून आणि समस्यांपासून अखेर सुटका मिळाली आहे. येथील रहिवाशांना तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या या दिलाशामुळे अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे.
    1
    अकोला येथील प्रभाग क्रमांक ११ कागझिपुरा मधील नागरिकांना गेल्या १० वर्षांपासून भेडसावणाऱ्या विविध त्रासांपासून आणि समस्यांपासून अखेर सुटका मिळाली आहे. येथील रहिवाशांना तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या या दिलाशामुळे अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतात पेरणी करूनही शेती संपूर्णपणे रिकामीच राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांना आता पुन्हा एकदा पेरणी करावी लागत आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतात पेरणी करूनही शेती संपूर्णपणे रिकामीच राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांना आता पुन्हा एकदा पेरणी करावी लागत आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील पिंपळगाव राजा येथे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. डॉ. पुरी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन बीएलओ (BLO), पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान मतदार यादीशी संबंधित नोंदी, गणनापत्रके आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच बीएलओ (BLO) यांच्या कामातील अडचणी समजून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. आयोजित आढावा बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी डॉ. रमेश पुरी यांनी मतदार यादीचे हे विशेष सखोल पुनरिक्षण अत्यंत अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांशी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील पिंपळगाव राजा येथे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. डॉ. पुरी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन बीएलओ (BLO), पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

या पाहणी दरम्यान मतदार यादीशी संबंधित नोंदी, गणनापत्रके आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच बीएलओ (BLO) यांच्या कामातील अडचणी समजून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

आयोजित आढावा बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी डॉ. रमेश पुरी यांनी मतदार यादीचे हे विशेष सखोल पुनरिक्षण अत्यंत अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांशी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    20 hrs ago
  • महाराष्ट्रात शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले असून सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले आहे. रोहितदादा पवार यांच्या पुढाकाराने हा लढा यशस्वी झाला आहे. शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी दाखवलेल्या या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याचे प्रसन्नजित पाटील यांनी म्हटले आहे.
    1
    महाराष्ट्रात शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले असून सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले आहे. रोहितदादा पवार यांच्या पुढाकाराने हा लढा यशस्वी झाला आहे. शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी दाखवलेल्या या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याचे प्रसन्नजित पाटील यांनी म्हटले आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.