logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी गोविंदपूरकर, सूळ मानेंसह दिग्गज इच्छुक ; पण अमित देशमुखांना खरंच किरण जाधवांना बदलायचे आहे का ? काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी गोविंदपूरकर, सूळ मानेंसह दिग्गज इच्छुक ; पण अमित देशमुखांना खरंच किरण जाधवांना बदलायचे आहे का ? ■ लॉबिंग करत ऐनवेळी किरण जाधवांनी अर्ज भरल्याने इच्छुकांचा संताप ■ जाधवांच्या सोबत ऐनवेळी शिवाजी जवळगेकरांचा केला जातोय उभा पर्याय ■ माजी महापौर दीपक सूळ व राजा माने यांनी निरीक्षकासमोर निवड प्रक्रियेत चुकीचा पायंडा पडत असल्याची केली तक्रार. लातुर दि - पुढील तीन वर्षे आता कोणतीही निवडणूक नसताना कॉंग्रेसने संघटन सृजन अभियान अंतर्गत सक्षम काँग्रेस कार्यकर्ता शोधून त्याला पद देण्यासाठी अभियान सुरू केले आहे.आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने निरीक्षक म्हणून एच.एस.लकी यांना लातूरला पाठवले आहे.अगदी लातुर शहर आणि लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज देखील मागवले जात आहेत.आणि या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात थोडीशी उदासीनता होती, मात्र ऐनवेळी लातुर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गोविंदपूरकर, माजी महापौर दीपक सूळ,राजा माने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या निवडीत रंगत आली आहे.शिवाय माजी महापौर दीपक सूळ आणि राजा माने यांनी जे निरीक्षक आले आहेत त्यांच्यासमोरच अध्यक्ष निवडताना जी लॉबिंग होते आहे त्यावर आक्षेप घेत ही लातुर काँग्रेसची संस्कृती नाही.चुकीचा पायंडा पडतो आहे.आम्ही देखील आमचे समर्थक आणू शकतो,पण ही पद्धत नाही.तर राजा माने यांनी लातूरमध्ये काँग्रेस मुस्लिम आणि दलित मतांवर टिकलेली आहे.आजपर्यंत निवडून आलेली आहे,व आजपर्यंत दलित काँग्रेसचा अध्यक्ष झालेला नाही.त्यामुळे पक्षाने लॉबिंग,उमेदवार लादणे असे प्रकार करू नये असे आक्षेप घेतले.अगदी शेवटच्या टप्प्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक गोविंदपूरकर, दीपक सूळ,राजा माने या दिग्गज मंडळीसह महेश काळे,शफी शेख,श्री.भरडे हे इच्छुक असले तरी खरंच अमित देशमुखांना किरण जाधवांना बदलायचे आहे का ? हा मूळ प्रश्न आहे.किरण जाधव हे अमित देशमुख यांचे अत्यंत विश्वासू आहेत.सोबतच त्यांना स्वीकृत नगरसेवक केले गेले आहे,विकास बँकेचे हे उपाध्यक्ष आहेत.त्यामुळे महानगरपालिका चालवण्यासाठी किरण जाधव यांना अध्यक्ष पदावरून बाजूला करणे अमित देशमुख यांच्या मनी आहे का हा प्रश्न असताना प्रक्रिया संपल्यानंतर अचानक नुकतेच स्वीकृत नगरसेवक झालेले शिवाजी जवळगेकर यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला असल्याने ज्यांनी उमेदवारी अर्ज यापूर्वी भरले ते कशासाठी भरून घेतले असा प्रश्न आता एकंदरीत या प्रक्रियेवर उपस्थित होत असून माजी उपमहापौर कैलास कांबळे यांचे देखील नाव ऐनवेळी येऊ शकते.आणि हे सर्व पहिलेच ठरले आहे तर इच्छुकांच्या कोपराला गूळ का लावला जातोय हे देखील अनुत्तरित आहे,ज्यावर अनेकांची नाराजी आहे.सोबतच ज्याला अध्यक्ष करायचे आहे त्याचा अर्ज ऐनवेळी भरून घ्यायचा आणि सर्व प्रक्रिया फाट्यावर मारायची हेच धोरण संघटन सृजन अभियानाचे लातुरात तरी दिसते आहे. लातुर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर लातुरात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान सुरू आहे.यातून नवीन पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.मात्र ही प्रक्रिया फक्त नावाला सुरू असून लातुर शहर जिल्हाध्यक्ष पहिलेच ठरला आहे,उगाच भर उन्हात इच्छुकांना पळवले जाते आहे हे स्पष्ट दिसत आहे.निरीक्षक म्हणून आलेले एच.एस.लकी हे उमेदवारी अर्ज मागवत असले तरी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यालाच अध्यक्ष केले जाणार,किंवा ज्याला अध्यक्ष करायचे आहे त्याचा अर्ज ऐनवेळी भरून घेतला जातो आहे.आणि हे कांही अर्ज ऑनलाइन नाहीत,किंवा ज्याचे नाव येणार आहे त्याने उमेदवारी अर्ज भरला होता का हे विचारण्याचे धाडस कोणातच नाही हे कांही वेगळे सांगायला नको.त्यामुळे नाव ठरलेले आहे हा फक्त सोपस्कार पार पाडला जातोय हे स्पष्ट दिसते आहे.याच निवडीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसांपूर्वी काँग्रेस भवनला एच.एस.लकी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.ज्या बैठकीत अनेक नगरसेवकांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांचे नाव घेतले.ज्यावर माजी महापौर दीपक सूळ यांनी आक्षेप घेत जिल्हाध्यक्षपदासाठी लॉबिंग करून पद दिले जात असेल तर आम्ही पण नगरसेवक आणि समर्थक आणू शकतो.हे लातुर आहे येथे अमित देशमुख जे सांगतात तोच अध्यक्ष होतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे.त्यामुळे आम्हाला अर्ज भरा म्हणुन सांगितले गेले नाही याचा अर्थ सर्व पहिलंच ठरले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.किरण जाधव यांचे कार्यकर्ते फोन करून नगरसेवकांना किरण जाधव यांचे नाव घ्या असे सांगत आहेत,मग आम्ही पण असेच करायचे का ? असा प्रश्न विचारला असता त्यानंतर कांही दिवसातच दिपक सूळ आणि अशोक गोविंदपूरकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.अगदी ज्या बैठकीत दीपक सूळ यांनी एकंदरीत प्रक्रियेवर आक्षेप घेतला त्याच बैठकीत राजा माने यांनी देखील ज्या मुस्लिम आणि दलित मतांमुळे लातुरमध्ये काँग्रेस जिवंत राहिली आहे त्यांना संधी द्या,आमचा बळी घेऊ नका अशी विनंती केली.मुस्लिम समाजाला अध्यक्ष केले गेले आहे,पण आजपर्यंत दलित समाजाला जिल्हाध्यक्षपद दिले गेले नाही अशी खंत व्यक्त केली.त्यामुळे खरंच संघटन सृजन अभियान यशस्वी करायचे असेल तर खऱ्या निष्ठावंताना संधी द्या अशी वीनंती देखील केली.आणि त्यानंतर मोठ्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू असून जेष्ठ नेते अशोक गोविंदपूरकर हे देखील आता स्पर्धेत आले आहेत.आणि ते देखील ही प्रक्रीया प्रामाणिकपणे पार पडावी या मतांचे आहेत.मात्र असे असताना गुप्त हालचाली देखील सुरू आहेत असे कळते.विद्यमान अध्यक्ष किरण जाधव यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरल्याने व बैठकीत लॉबिंग केल्याने त्यांना पून्हा अध्यक्ष व्हायचे आहे हे कांही वेगळे सांगायला नको.शिवाय अमित देशमुख यांना देखील किरण जाधव यांना बदलायचे आहे की नाही हा प्रश्न आहेच.कारण महानगरपालिका चालवताना जिल्हाध्यक्षाची भूमिका ही महत्वाची असते.सर्वसाधारण सभेच्या पूर्वी किंवा कोणता निर्णय घेण्याच्या पूर्वी जिल्हाध्यक्ष यांची भूमिका महत्त्वाची असते.त्यामुळे या पदावर अमित देशमुख आपला विश्वासातील अध्यक्ष किरण जाधव यांच्या रूपाने बसवतील हे स्पष्ट दिसते आहे.अन्यथा मग कोणी तरी हुशार नसलेला किंवा राजकीय प्रभावी नसलेला बसवतील अश्या हालचाली सुरू आहेत.ज्यातून शिवाजी जवळगेकर,माजी उपमहापौर कैलास कांबळे अशी नावे चाचपणी सुरू आहे.कांही दिवसांपूर्वी शहरातील मातंग समाजातील कांही युवकांनी अमित देशमुख यांच्या फोटोला समोर ठेवून त्यांना काळिमा फासला, ज्याचे पडसाद लातुरात उमटले, आणि अमित देशमुख यांनी देखील त्या युवकांवर गुन्हा दाखल केला.शहारत मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे,त्यामुळे जे प्रकरण होते त्यामुळे आणि दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे मातंग समाजात नाराजी होऊ नये,आणि त्याचा फटका बसू नये म्हणून ऐनवेळी शिवाजी जवळगेकर यांचा पत्ता समोर आणला गेला आहे असे कळते.त्यामुळे अशोक गोविंदपूरकर, दिपक सूळ,राजा माने अश्या प्रभावी व महानगरपालिका प्रशासनावर पकड असलेल्या नेत्यांना संधी दिली जाणार नाही हे अगदी निर्विवाद आहे.कारण हे लोक प्रत्येक निर्णय विचारून घेतील असे मुळीच नाही.त्यामुळे दीपक सूळ यांनी बैठकीत आक्षेप घेतल्यानंतर अशोक गोविंदपूरकर, दीपक सूळ यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला गेला हे कांही वेगळे सांगायला नको.मात्र त्यांना संधी दिली जाणार नाही हे देखील तितकेच खरे.ही निवड करताना जातीय गणिते घातली जावीत असा देखील प्रवाह काँग्रेसमध्ये आहे.म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख हयात असताना त्यांची एक पद्धत होती की सत्तेतील पदे ही बहुजनांना द्यायची,कारण ते निवडून येऊ शकतात.मात्र जे निवडून येऊ शकत नाहीत,ज्यांचा समाज मोठा नाही,अश्यांना संघटनेत संधी द्यायची हे धोरण त्यांनी राबवले. मात्र गेली 15 वर्षात हे धोरण बदलत चालले असून सत्तेत आणि संघटनेत देखील बहुजनांना संधी दिली जाते आहे हे लातुर कॉंग्रेसचे बदलते रूप पहायला मिळतंय. प्रायमरीमध्ये लॉबिंग झालेली माने विसरले का ? दरम्यान लातुर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले राजा माने हे दिवंगत माजी आमदार रेवप्पा माने यांचे सुपुत्र आहेत.लातुर महानगरपालिका निवडणुकीत देखील ते इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही.राजा माने हे काँग्रेसचे जेष्ठ नेते मोहन माने यांचे बंधू आहेत.हे तेच मोहन माने आहेत ज्यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत राखीव असलेल्या लातुर लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला होता.आणि आज जसे काँग्रेसमध्ये संघटन सृजन अभियान संघटना मजबूत करण्यासाठी व पदाधिकारी नेमण्यासाठी सुरू आहे अगदी राहुल गांधी यांच्या कल्पनेतुन लोकसभा निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या ठिकाणी प्रायमरी निवडणूक होईल व त्या निवडणुकीतुन उमेदवार ठरवला जाईल यासाठी ती प्रायमरी निवडणूक झाली होती.ज्यात दत्तात्रय बनसोडे हे उमेदवार ठरवले गेले,त्यांच्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने लॉबिंग केली,सर्वांना निरोप देऊन दत्तात्रय बनसोडे यांचे नाव घ्या असे निरोप दिले गेले.व अगदी तसेच झाले.व मोहन माने यांचा पत्ता कटला.त्यावेळी मोहन माने यांनी घेतलेली उघड भूमिका राज्यभर चर्चचा विषय झाला होता.अगदी मोहन माने यांनी स्थानिक काँग्रेस नेतृत्वाची एकाधिकारशाही व हुकूमशाहीला कंटाळुन काँग्रेस सोडली देखील होती.आज 12 वर्षांनंतर त्याच माने परिवारातील राजा माने एकंदरीत प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत.जेथे राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील प्रायमरी निवडणुकीत जी की लोकसभे सारख्या महत्वाच्या जागेसाठी होती,तेथे लॉबिंग आणि ठरवून उमेदवार निवडला गेला असेल तेथे आज जिल्हाध्यक्ष निवडताना पारदर्शक प्रक्रिया पार पडणारच नाही.यात जे अमित देशमुख ठरवतील तेच होणार आहे हे संघटन सृजन अभियान,उमेदवारी अर्ज भरणे, निरीक्षक आणणे हा निव्वळ फार्स असून फक्त कागदोपत्री सोपस्कार पार पाडायचे आहेत म्हणून हे अभियान लातुर जिल्ह्यात पार पाडले जाते आहे हे इतिहास आणि अनुभव पाहता वेगळे सांगायला नको.6

4 hrs ago
user_अशोक दगडू वाघमारे
अशोक दगडू वाघमारे
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•

More news from Maharashtra and nearby areas
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    1
    लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी.
निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. 
लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे
ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि
लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे
व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या
विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    29 min ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    1
    लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.