पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मॅक्स मंथन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; १३ समाजभूषण रत्नांचा गौरव पिंपरी-चिंचवड: सत्याचा शोध आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ चा प्रथम वर्धापन दिन आणि ‘मॅक्स मंथन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ रत्नांना ‘मॅक्स मंथन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी भूषविले. व्यासपीठावर मुंबई हायकोर्टाच्या ज्येष्ठ एडवोकेट राजेश्वरी भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, ज्येष्ठ पत्रकार बाबू उर्फ सुनील कांबळे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर श्रद्धा प्रभुणे, संदीप काटे, एडवोकेट प्रवीण जगताप, पीएसआय अतुल जगताप, नाट्यकर्मी संतोष रासने, युवा उद्योजक दीपक रोकडे, ज्येष्ठ नागरिक सुधाकर कुंजीर, स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश नवले, ओबीसी संघर्ष समितीचे शहराध्यक्ष आनंदा कुदळे, पिंपरी lIB चे पोलीस संदीप पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्काचे मुख्य लिपिक अभिजीत डोळस, राष्ट्रीय कबड्डीपटू विष्णू जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नढे, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या सुमन कुंजीर, पत्रकार देवा भालके, सुलतान लघुपटाचे जागतिक अवॉर्ड विजेते अविनाश खांबीकर, पीसीएमसी न्यूज चे सर्वेसर्वा मुकेश जाधव, नारी द मन संस्थेच्या परवीण शेख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे म्हणाले की, "लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवण्यासाठी निस्पृह पत्रकारितेची गरज आहे. ‘मॅक्स मंथन’ने एका वर्षात विश्वासार्हता कमावली असून, समाजातील चांगल्या कामाची दखल घेणे हे जिवंत पत्रकारितेचे लक्षण आहे. सध्या टेलिव्हिजनवर चालू असलेल्या न्यूज चैनल च्या बातम्या किती खऱ्या आहेत याच्यावर शंका निर्माण होत असते त्यामुळे त्वरित आणि झटपट बातमी मिळवायचे असेल तर अशा पोर्टलच्या बातम्यांचा उपयोग नक्कीच होतो." सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, "मॅक्स मंथन डेली न्यूज चे भाई विशाल जाधव हे आमचे वीस पंचवीस वर्षाचे मित्र आहेत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना घेतलेला दांडगा अनुभव आज त्यांनी आपल्या पत्रकार दिनाच्या लेखणीमध्ये प्रत्यक्षात उतरवला खऱ्या अर्थाने त्यांनी अल्पवधीमध्येच या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिके मधील वेगवेगळ्या कामावर त्यांचे अचूक लक्ष असते. नारीशक्ती काय असते हे आमच्या वहिनी सौ प्राजक्ता जाधव यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या मुख्य सूत्रधार त्याच आहेत." पुरस्कारार्थींची नामावली: या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार (कला गौरव), अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे (प्रशासकीय सेवा), डॉ. हनुमंत चव्हाण (धन्वंतरी गौरव), अमोल डोळस (समाज गौरव), भरत काटे (हॉटेल उद्योग रत्न), नॅशनल नेमबाज समिता गोरे (क्रीडा रत्न), दयानंद मालगे (युवा उद्योजक), अर्चना मेंगडे (सामाजिक क्रांती), श्रद्धा रोकडे (स्त्री शक्ती गौरव), राजू बंग (कलारत्न), शिल्पकार महेंद्र थोपटे (वास्तु कलारत्न), गिरीश चिद्दरवार (वास्तु कलारत्न) आणि निलेश जवळकर (युवा उद्योजक गौरव) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मॅक्स मंथन’चे संपादक विशाल जाधव यांनी केले. त्यांनी चॅनेलच्या वर्षभराच्या प्रवासाचा आढावा घेत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. सौ. प्राजक्ता जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार शिवाजी घोडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम समन्वय साधले. प्रसिद्ध कथक नृत्यांगना फिरोज मुजावर आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढवली. प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे यांनी पुरस्कार सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली त्यांचाही सन्मान यावेळी माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे साहेब यांच्या हस्ते घेण्यात आला. मॅक्स मंथन पुरस्कार सोहळ्याची समितीचे अध्यक्ष सदस्या एडवोकेट विद्या शिंदे, एडवोकेट प्रियंका ढगे, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक शिवाजी घोडे, यांना उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. साठे हॉस्पिटलिटी चे सर्वेसर्वा नीलिमा साठे ,निलेश साठे व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य म्हणून सन्मान करण्यात आला त्यांचा सन्मान शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्लेखनीय सहकार्य करणारे ऋत्विक पवार, मनोज प्रधान, भैय्या जगधने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंथन जाधव यांनी मानले.

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1