क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; विकासकामांचे दिले निर्देश पिंपरी-चिंचवड: शहरात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असून, याच पार्श्वभूमीवर क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध क्रीडा प्रकल्पांचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी क्रीडा विभागाच्या उपायुक्तांसह मैदानांची सद्यस्थिती आणि देखभालीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाले यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील विविध व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि मैदानांची पाहणी करून तेथील त्रुटी समजून घेतल्या. दौऱ्यादरम्यान प्राधिकरणातील सेक्टर २६ मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव व व्यायामशाळा, डॉ. हेडगेवार भवन येथील लॉन टेनिस कोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हॉल आणि सावरकर उद्यानातील टेनिस कोर्टला भेट देण्यात आली. तसेच निगडी परिसरातील मदनलाल धिंग्रा मैदान, बाहुबली व्यायामशाळा आणि सेक्टर २८ मधील कै. संजय काळे मैदान व कुस्ती संकुलाची पाहणी करून खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती कैलास कुटे यांनी स्पष्ट केले की, शहरातील तरुणांना आणि उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मैदानांची योग्य देखभाल, विद्युत व्यवस्था आणि आवश्यक त्या तांत्रिक सुधारणांबाबत त्यांनी उपस्थित इंजिनिअर्सना सूचना दिल्या. या पाहणीसाठी क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, ज्युनिअर इंजिनिअर संदीप ठोकळे, संकेत गंधमवार आणि क्रीडा अधिकारी गंगाराम कारंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. आगामी काळात या सर्व क्रीडा संकुलांचा कायापालट करून खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; विकासकामांचे दिले निर्देश पिंपरी-चिंचवड: शहरात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असून, याच पार्श्वभूमीवर क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध क्रीडा प्रकल्पांचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी क्रीडा विभागाच्या उपायुक्तांसह मैदानांची सद्यस्थिती आणि देखभालीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाले यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील विविध व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि मैदानांची पाहणी करून तेथील त्रुटी समजून घेतल्या. दौऱ्यादरम्यान प्राधिकरणातील सेक्टर २६ मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव व व्यायामशाळा, डॉ. हेडगेवार भवन
येथील लॉन टेनिस कोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हॉल आणि सावरकर उद्यानातील टेनिस कोर्टला भेट देण्यात आली. तसेच निगडी परिसरातील मदनलाल धिंग्रा मैदान, बाहुबली व्यायामशाळा आणि सेक्टर २८ मधील कै. संजय काळे मैदान व कुस्ती संकुलाची पाहणी करून खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती कैलास कुटे यांनी स्पष्ट केले की, शहरातील तरुणांना आणि उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मैदानांची योग्य देखभाल, विद्युत व्यवस्था आणि आवश्यक त्या तांत्रिक सुधारणांबाबत त्यांनी उपस्थित इंजिनिअर्सना सूचना दिल्या. या पाहणीसाठी क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, ज्युनिअर इंजिनिअर संदीप ठोकळे, संकेत गंधमवार आणि क्रीडा अधिकारी गंगाराम कारंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. आगामी काळात या सर्व क्रीडा संकुलांचा कायापालट करून खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp1
- *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1