शहापूरच्या जि. प. शाळेतील जीत पाटीलची ठाणे जिल्ह्यातून बंगळुरच्या राष्ट्रीय मिलिटरी शाळेत निवड ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अल्याणी शाळेतील विद्यार्थी १२ वर्षाचा जीत पाटील याची ठाणे जिल्ह्यातून बंगळुरूच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये निवड झाली आहे. जिल्ह्यातून या स्कूलसाठी निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे. खडतर, आव्हानात्मक असलेल्या या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थी पहिल्याच टप्प्यात बाद होतात. परंतु या सर्व आव्हानांना तोंड देत जीत (१२) याने या निवड प्रक्रियेत यशस्वी होण्याचा मान पटकावला आहे. जीत पाटील हा ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. ठाणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन जीत याने ही मजल मारल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. शालेय जीवनापासून जीतने राष्ट्रीय सेवेचा भाग म्हणून लष्करी सेवेत जाण्याचे मनाने ठरवले होते. त्याच्या पालकांनीही त्याला उत्तेजन देऊन त्याची मानसिकता लष्करी सेवेसाठी तयार केली होती. स्वताजवळील दुर्दम्य इच्छाशक्ती, आई, वडील, शिक्षिका,शाळेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, याशिवाय शहापूरच्या नाॅलेज ॲकेडमीचे सचिव अरूण पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी, सदस्य, आयकॅन इन्स्टिट्यूट,सातारा यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शहापूर गट शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. ध्येय, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यांच्या संगमातून जीतने ही बाजी मारली आहे. राष्ट्र सेवा कार्यातील महत्वाच्या आणि सर्वोच्च काठीण्य पातळी असणाऱ्या राष्ट्रीय मिलिटरी शाळेच्या प्रवेश परीक्षेत जीतला १५० पेैकी १३६ गुण मिळाले आहेत. नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत त्याला ३०० पैकी २८४ गुण मिळाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत ठाणे, पालघर जिल्ह्यातून ९७.५ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. एकाच वर्षात तीनही लागोपाठ झालेल्या केंद्रीय प्रवेश परीक्षांमध्ये त्याने हे यश संपादन केले. प्रवेश परीक्षा जीतने राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या राजस्थान अजमेर येथे झालेल्या गटसमुह मुलाखतीत यश मिळवले. मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथील वैद्यकीय चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर त्याची बंगळुरू येथील निवड अंतीम झाली. देशसेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा उपक्रम राबविला जातो. या देशभरात केवळ पाच शाळा आहेत. यावर्षी देशाभारतील ३६५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून त्यात फक्त ३६ सिव्हिलियन्स विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा अल्याणीच्या जीतचा त्यात समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषद गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या यशस्वीतेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व नवोदय विद्यालय प्रवेशपात्र होत आहेत. यात शहापूर तालुका नेहमीच अव्वल राहिला आहे, असे शहापूर तालुका नाॅलेज ॲकेडमीचे सचिव अरूण पाटील यांनी सांगितले.

- इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे माध्यमातून मध्यवर्ती रुग्णालय समोर हस्ताक्षर अभियान इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे माध्यमातून मध्यवर्ती रुग्णालय समोर हस्ताक्षर अभियान1
- एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.1
- कार में लगी भीषण आग, मुंब्रा रेतीबंदर की घटना। कोई जानी नुकसान नहीं हुआ।1
- मुंब्रा में एम एम वैली पर एक्टिवा सीखने गई महिलाओं में झगड़ा1
- नितेश राणे को जग्गा जासूस बना दो,MIM नेता सैफ पठान का बयान || Islamuddin Khan नितेश राणे को जग्गा जासूस बना दो,MIM नेता सैफ पठान का बयान || Islamuddin Khan1
- ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बी२ पार्किंगमध्ये सीवेज गळती झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.1
- ठाण्यातील एका MBO मल्टी-ब्रँड शोरूममध्ये नोंदणी नसलेल्या आणि बनावट नंबर प्लेट्सच्या गाड्या खुलेआम विकल्या जात आहेत. आरटीओच्या नाकाखालीच हा बेफाम कारभार सुरू असून, ग्राहकांना नियमांविरुद्ध वाहनं दिली जात असल्याचा आरोप आहे.1
- उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भगवान लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. गजानन लिंबोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मृताच्या पत्नी सौ. आशा भगवान लिंबोरे यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.1