बोगस बियाण्यांचा फटका! यड्रावच्या शेतकऱ्याचा कलिंगड प्लॉट उद्ध्वस्त; लाखोंचा फटका, कारवाईची मागणी शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील शेतकरी श्रेणिक उदगावे यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.जयसिंगपूर येथील कचरे रोपवाटिकेतून सिमन एस सीड्स भुजंग कंपनीची सुमारे ४२०० कलिंगडाची रोपे खरेदी करून त्यांनी लागवड केली होती.यासाठी तब्बल १ लाख १० हजार रुपयांचा खर्च करत त्यांनी मोठ्या मेहनतीने पिक जोपासले.मात्र लागवडीला ७७ दिवस उलटूनही कलिंगड कापल्यावर आतून पांढरे निघत असल्याने संपूर्ण प्लॉट अक्षरशः उध्वस्त झाला आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उदगावे यांनी शेतातच कलिंगड फोडून आपला संताप व्यक्त केला.आमच्या कष्टाची थट्टा झाली,अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणी शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू कुरडे यांनी थेट इशारा देत संबंधित बियाणे कंपनी आणि रोपवाटिकेविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेताला भेट देऊन पाहणी केली.तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जंगटे,उपविभागीय कृषी अधिकारी पोपट, गुणनियंत्रण अधिकारी अनुप रासकर आदींनी पंचनामा सुरू केला असून नेमके कारण शोधण्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लाखो रुपयांच्या नुकसानीला नेमके जबाबदार कोण - बियाणे कंपनी की रोपवाटिका - याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बोगस बियाण्यांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत असताना अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी आता होत आहे.

- Post by E city news network1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- diva nagar sevak (enjoy life)1
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1