नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी 339 मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले. या निवडणुकीसाठी भाजपचे अमरनाथ राजूरकर, अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आणि प्रशांत इंगोले असे एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉलमध्ये कडेकोट बंदोबस्तात, शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. मतमोजणीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी मतमोजणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रक्रियेबाबत निर्देश दिले. तीन टेबलांवर झालेल्या मतमोजणीत 428 मते वैध ठरली, तर 23 मते अवैध ठरवण्यात आली. वैध मतांपैकी अमरनाथ राजूरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा नागेश पाटील यांना 84 मते, तर प्रशांत विराज इंगोले यांना 5 मते मिळाली. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांनी निवडणूक प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी 339 मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले. या निवडणुकीसाठी भाजपचे अमरनाथ राजूरकर, अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आणि प्रशांत इंगोले असे एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉलमध्ये कडेकोट बंदोबस्तात, शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. मतमोजणीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी मतमोजणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रक्रियेबाबत निर्देश दिले. तीन टेबलांवर झालेल्या मतमोजणीत
428 मते वैध ठरली, तर 23 मते अवैध ठरवण्यात आली. वैध मतांपैकी अमरनाथ राजूरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा नागेश पाटील यांना 84 मते, तर प्रशांत विराज इंगोले यांना 5 मते मिळाली. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांनी निवडणूक प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
- हिंगोलीच्या राजकारणात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला असून, बंडखोरीनंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कुठेही जाण्याचा किंवा कोणत्याही पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र, त्यांच्यावर अविश्वास दाखवला गेल्यामुळे, त्याच क्षणी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आष्टीकरांच्या या खुलाशामुळे हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची चर्चा आहे, तसेच शिवसेनेत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे, नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- नांदेड शहरामध्ये, आधार हॉस्पिटलच्या शेजारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची तपासणी केली जाईल.1
- सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.1
- गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.1
- नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी विजय मिळवला आहे. अमरनाथ राजूरकर हे या मतदारसंघातून विजयी घोषित झाले आहेत.1
- राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटातून श्री राजेंद्र जैन हे राज्यसभा सदस्य म्हणून खासदार आहेत.1
- माळेगाव येथे संध्याकाळी ठीक ५:०० वाजता जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुटले. या कारणामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. ही माळेगाव येथील सत्य घटना आहे.2