logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वच्छता ही सेवा अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे : महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन *घराघरांत उजळणार स्वच्छतेचा दीप* पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छ, निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थी तसेच शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्वच्छता ही केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक घरातून आणि प्रत्येक कुटुंबातून सुरू व्हावी, या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा. स्वच्छतेचा हा दीप आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आणि स्वच्छ जीवनशैलीचा संकल्प अधिक दृढ करणारा ठरावा, असा महापालिकेचा उद्देश आहे. महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ शहराची सुरुवात आपल्या घरापासून होते. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शहराच्या स्वच्छतेवर होतो. त्यामुळे नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी आपल्या घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छतेचा संकल्प करावा. या उपक्रमात पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने अंगीकारायची जीवनशैली आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसह शहरातील प्रत्येक नागरिकाने १७ सप्टेंबरच्या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ, निरोगी आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.” उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियमित स्वच्छतेच्या सवयींमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाकडे केवळ एक दिवसाचा कार्यक्रम म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी अंगीकारावी आणि १७ सप्टेंबर रोजी आवर्जून सहभागी व्हावे.” उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, “नागरिकांचा सहभाग हा स्वच्छता अभियानाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक घरातून स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी आपल्या घराची स्वच्छता करावी, दिवा प्रज्वलित करून स्वच्छ आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा. तसेच आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करून या अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळवून द्यावा.” *नागरिकांनी असा नोंदवावा आपला सहभाग* उपक्रमात सहभागी झाल्यानंतर नागरिकांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या संकेतस्थळावर आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करावी. त्यासाठी ‘सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करा’ हा पर्याय निवडून नाव, वय आणि लिंग आदी आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा उपक्रम प्रकार निवडून घराच्या स्वच्छतेनंतरचे छायाचित्र अपलोड करावे. छायाचित्र अपलोड केल्यानंतर नागरिकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक कुटुंबाने या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवडच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.

7 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago
ebdd4b0a-fcaf-4e30-b02c-b14f434740fa

More news from Maharashtra and nearby areas
  • "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"
    1
    "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    9 hrs ago
  • शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
    1
    शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    1
    बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महाराष्ट्र में अस्पतालों की लूट का बड़ा खुलासा महाराष्ट्र FDA अधिकारी तुकाराम मुंडे ने अस्पतालों में भारी मुनाफाखोरी का खुलासा किया। 11 रुपये का IV सेट 325 रुपये, 40 का नेबुलाइजर 715 रुपये और 22 की कैनुला 424 रुपये में बेची गई। 2841% तक लूट से गरीब मरीज सबसे ज्यादा परेशान हैं।
    1
    महाराष्ट्र में अस्पतालों की लूट का बड़ा खुलासा

महाराष्ट्र FDA अधिकारी तुकाराम मुंडे ने अस्पतालों में भारी मुनाफाखोरी का खुलासा किया। 11 रुपये का IV सेट 325 रुपये, 40 का नेबुलाइजर 715 रुपये और 22 की कैनुला 424 रुपये में बेची गई। 2841% तक लूट से गरीब मरीज सबसे ज्यादा परेशान हैं।
    user_AAPKi JUNG
    AAPKi JUNG
    Newspaper publisher Ulhasnagar, Thane•
    1 day ago
  • देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा तालिबान करायचा ठरवले आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना पुण्यात गावगुंडांकडून रोखले जाते, धमकावले जाते आणि लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा-सुव्यवस्थेवरील अपयशाचे उदाहरण आहे. अभिनेत्री असलेली महिला आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य महिला कशी सुरक्षित असेल? हा तार्किक प्रश्न निर्माण होतो. पुणे शहर आणि परिसरात दररोज किमान एक तरी अशी घटना घडते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. फडणवीस स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी जितका प्रयत्न करतात, तितकाच प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी का करत नाहीत? हा सर्वसामान्य पुणेकरांचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षाचा सवाल आहे. फडणवीस, तुम्हाला जमत असेल तर खुर्ची खाली करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या!
    1
    देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा तालिबान करायचा ठरवले आहे का?

सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना पुण्यात गावगुंडांकडून रोखले जाते, धमकावले जाते आणि लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा-सुव्यवस्थेवरील अपयशाचे उदाहरण आहे.
अभिनेत्री असलेली महिला आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य महिला कशी सुरक्षित असेल? हा तार्किक प्रश्न निर्माण होतो.
पुणे शहर आणि परिसरात दररोज किमान एक तरी अशी घटना घडते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
फडणवीस स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी जितका प्रयत्न करतात, तितकाच प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी का करत नाहीत? हा सर्वसामान्य पुणेकरांचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षाचा सवाल आहे.
फडणवीस, तुम्हाला जमत असेल तर खुर्ची खाली करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या!
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळली! थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ST सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह
    1
    विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळली! थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ST सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • "......भाषा यापुढे सहनही करणार नाही.., हेही स्पष्ट करतो..!"
    1
    "......भाषा यापुढे सहनही करणार नाही.., हेही स्पष्ट करतो..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    20 hrs ago
  • एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ₹४६०१.१३ कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला आहे. तात्काळ वळवलेला निधी परत करा, अशी आक्रमक भूमिका घेत एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले.
    1
    एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा
एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा
एससी-एसटीचा ₹४६०१.१३ कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला आहे. तात्काळ वळवलेला निधी परत करा, अशी आक्रमक भूमिका घेत एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.