लोहारडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा, पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे यांच्या 'अन्नत्याग सत्याग्रहा'ला खासदार प्रतिभा धानोरकरांचा पाठिंबा चंद्रपूर : प्रस्तावित 'लोहारडोंगरी' लोह खनिज उत्खनन प्रकल्पामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरला निर्माण झालेला धोका आणि जिल्ह्यातील भीषण मानवी-वन्यजीव संघर्ष या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'अन्नत्याग सत्याग्रह' सुरू केला आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या प्रलंबित १६ मागण्या जाणून घेतल्या. याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक संगीता अमृतकर, नगरसेविका सुनंदा धोबे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, प्रोफेशनल काँग्रेस अध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, माजी नगरसेवक अशोक नागपुरे, प्रतिभा पेंदोर, शहजाद शेख, आशिष बोन्डे यांची उपस्थिती होती.

- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- Post by Pitam Parjapati4
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.2
- चंद्रपुरात 5 मार्चपासून पर्यावरणवादी बंडू धोतरे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, वाघाच्या अधिवासात लोहारडोंगरी खाणीला सरकारने मंजुरी दिल्यामुळे ती मंजुरी रद्द करावी या मागणीसाठी धोतरे यांचे आंदोलन सुरू आहे. 9 मार्च रोजी पोलीस प्रशासनाने त्यांना आंदोलन मंडपातून बळजबरीने रुग्णालयात दाखल करीत त्यांचे आंदोलन दडपण्याचा एक प्रयत्न केला, आज धोतरे यांनी रुग्णालयातून नागरिकांना आवाहन केले की माझं अन्नत्याग आंदोलन हे सुरूच राहणार हा लढा थांबणार नाही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.1