logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंचायत समिती कार्यालयात एचपीव्ही लसीकरण समन्वयक समितीची सभा एचपीव्ही लसीकरण समन्वयक समितीची सभा अर्जुनी मोरगाव : महिला व बाल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी पंचायत समिती कार्यालयात समन्वय समितीची विशेष सभा पार पडली. सदर सभेचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर उपस्थित होते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी तालुक्यात व्हावी, हा या सभेचा मुख्य उद्देश होता. बैठकीत प्रामुख्याने लाभार्थी मुलींची नोंदणी, जनजागृती आणि लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या की, 'कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. जास्तीत जास्त मुलींपर्यंत ही लस पोहोचावी यासाठी आरोग्य विभागासोबतच इतर विभागांचा समन्वय आवश्यक आहे.' त्यांनी लसीकरणाचे वेळापत्रक आणि तांत्रिक बाबींची माहितीही दिली. यावेळी पल्लवी वाडेकर यांनी, सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले, शाळा आणि अंगणवाडी स्तरावर प्रभावी जनजागृती करावी,पालकांमध्ये असलेल्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करावे, कोणताही पात्र लाभार्थी या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, या बैठकीला तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

2 hrs ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
Sadak-Arjuni, Gondia•
2 hrs ago
7d7cc91d-26a2-4c0c-b692-41f05c2669e5

पंचायत समिती कार्यालयात एचपीव्ही लसीकरण समन्वयक समितीची सभा एचपीव्ही लसीकरण समन्वयक समितीची सभा अर्जुनी मोरगाव : महिला व बाल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी पंचायत समिती कार्यालयात समन्वय समितीची विशेष सभा पार पडली. सदर सभेचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर उपस्थित होते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी तालुक्यात व्हावी, हा या सभेचा मुख्य उद्देश होता. बैठकीत प्रामुख्याने लाभार्थी मुलींची नोंदणी, जनजागृती आणि लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या की, 'कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. जास्तीत जास्त मुलींपर्यंत ही लस पोहोचावी यासाठी आरोग्य विभागासोबतच इतर विभागांचा समन्वय आवश्यक आहे.' त्यांनी लसीकरणाचे वेळापत्रक आणि तांत्रिक बाबींची माहितीही दिली. यावेळी पल्लवी वाडेकर यांनी, सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले, शाळा आणि अंगणवाडी स्तरावर प्रभावी जनजागृती करावी,पालकांमध्ये असलेल्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करावे, कोणताही पात्र लाभार्थी या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, या बैठकीला तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from Gondia and nearby areas
  • *शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबद,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..* मोरगाव अर्जुनी, अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्त विधमाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात मा. तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दि. 15 एप्रिल पासून 14 विविध मुद्धांवरून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु आहे.उपोषणाचा सातवा दिवस सुरु असूनही अजूनही कोणी भेट देण्याकरिता आला नाही किंवा समस्या ऐकायला आला नाही.त्यामुळे दोन ते तीन दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर असंख्य शेतकरी घटनास्थळी जमा होऊन आंदोलन करू, रस्ता रोको करू,तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयाला घेराव करू,तसेच रेल रोको आणि आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
    1
    *शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबद,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..*
मोरगाव अर्जुनी,
अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्त विधमाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात मा. तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दि. 15 एप्रिल पासून 14 विविध मुद्धांवरून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु आहे.उपोषणाचा सातवा दिवस सुरु असूनही अजूनही कोणी भेट देण्याकरिता आला नाही किंवा समस्या ऐकायला आला नाही.त्यामुळे दोन ते तीन दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर असंख्य शेतकरी घटनास्थळी जमा होऊन आंदोलन करू, रस्ता रोको करू,तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयाला घेराव करू,तसेच रेल रोको आणि आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    32 min ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    6 hrs ago
  • काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे
    4
    काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले 
काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    1
    नमो उद्याणास तयार विरोध
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    54 min ago
  • कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    3
    कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! 
अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… 
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे…
नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत…
इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे…
सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे!
स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
    1
    कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू
नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले.
या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    30 min ago
  • शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध . भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया
    1
    शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध .
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.