Shuru
Apke Nagar Ki App…
HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ | Nutexy HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight
Dr.Mirza Md.Meher Abbas
HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ | Nutexy HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Pitam Parjapati2
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- सरकारने आम्हाला सिलेंडरचा नियोजन द्यावं कॅटरिंग असोशीएशनची मागणी वर्धा इरान आणी इजराईलच्या सुरु असलेल्या युद्ध मुळे भारतात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.आता या सिलेंडर तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आल्याने कॅटरिंग व्यवायिक संकटात सापडला आहे. पुढे घेतलेले लग्न आणी इतर समारोहचे ऑर्डर कसे करायचे याची चिंता व्यावसायिकांना पडली आहे.सरकारने आम्हाला सिलेंडरच नियोजन द्यावं अशी मागणी कॅटरिंग असोशीएशन केली आहे. जिल्ह्यात कॅटरिंग व्यावसायिकांना सिलेंडरचा पुरवठा बंद केला आहे. टंचाईलामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय मात्र कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढील घेतलेले ऑर्डर कसे करायचे याची चिंता त्यांना लागली आहे. सिलेंडर पुरवठादार हे पुढे दहा ते पंधरा दिवस थांबण्याचा सांगत आहे यामुळे कॅटरिंग काम बंद पडणार असल्याच्या मार्गांवर आहे. - पुढे लग्नाचे मुहूर्त आहे यात नागरिकांची पहिलेच घेतलेली ऍडव्हान्स बुकिंग मात्र आता सिलेंडरचा तुटवडा आलाय. यात कामे बंद पडल्याने मोठा आर्थिक संकट समोर ठाकलंय. मजुरांचे पगार, नागरिकांकडून घेतलेली ऍडव्हान्स रक्कम आणी कामाचे नुकसान याची चिंता आता कॅटरिंग व्यवसायिकांना सतावत आहे.1
- एका वैभवशाली महानगरपालिकेची झालेली ही दुरावस्था कोणामुळे झाली ? नागपूर विशेष प्रतिनिधी मुंबई/पुणे/ चंद्रपूर: "श्रीमंत महानगरपालिका" असा कधीकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नावलौकिक होता. आज त्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना सभागृहात येऊन अनेक समस्यांचा पाढा वाचावा लागत आहे. एका वैभवशाली महानगरपालिकेची झालेली ही दुरावस्था कोणामुळे झाली ? प्रशासक राजवटीच्या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेल्या शेखर सिंह या अधिकाऱ्यांनी ही श्रीमंत महानगरपालिका कंगाल केली, महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या, तरीही महानगरपालिकेकडे विकास कामांसाठी पैसा नाही. म्हणूनच शेखर सिंह यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाचे ऑडिट व्हावे अशी सभागृहात मागणी केली.1
- Post by Samachar king digital1
- Post by Ammar haider (ezaan)1
- *सिंदी रेल्वे परिसरात 'लक्झरी' चोरांचा थरार* *सिंदी (रेल्वे):* वर्धा एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असताना, चोरीच्या पद्धतीही आता हायटेक झाल्या आहेत. सिंदी रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चक्क एका आलिशान कारमधून येत डबक्यांच्या कळपावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी मस्जिद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या, तर बैल चोरीचा प्रयत्न थोडक्यात फसला. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:५१ च्या सुमारास शहरात एक लाल रंगाची आलिशान कार दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. मोठी मस्जिद परिसरातून शुभम निमजे यांच्या ३ बकऱ्या (किंमत ४५,००० रुपये) आणि इरफान काजी प्यारू शेख यांच्या २ बकऱ्या (किंमत ३०,००० रुपये) गाडीत कोंबून पळवून नेल्या. एकाच रात्रीत एकूण ७५ हजार रुपयांचे पशुधन लंपास करण्यात आले. त्याच रात्री या टोळीने पळसगाव मार्गावरील वसंता बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न फसला आणि बैल वाचले. या चोरीच्या घटनेनंतर नागरिक संतापलेले आहेत. विशेष म्हणजे, पीडित तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तातडीने मदत मिळण्याऐवजी 'लेखी रिपोर्ट' आणण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे तक्रार नोंदवण्यास संध्याकाळ झाली. जर पोलिसांनी वेळीच सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी केली असती, तर आरोपी कारसह जेरबंद झाले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिंदी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्याच आठवड्यात पिपरा मार्गावरील गणपत बेलखोडे यांच्याही ५-६ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. चोरटे आता आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होत आहे. आलिशान कारचा वापर जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मध्यरात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान. रात्रीची गस्त वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी. रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत आलिशान कारमधून पशुधनाची तस्करी होतेच कशी? शहर आता सुरक्षित राहिले आहे का?1
- विशेष प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क मुंबई/ चंद्रपूर: राज्यात सध्या खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अनधिकृत 'फार्मर आयडी' वाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा केवळ ओळखपत्र वाटपाचा विषय नसून, बळीराजाची अत्यंत खासगी आणि संवेदनशील माहिती एखाद्या अनोळखी कंपनीच्या हाती जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या माहितीचा भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा डेटा जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी रोखण्यासाठी शासनाकडून कोणतीही ठोस यंत्रणा उभी केलेली दिसत नाही. एखादी खासगी कंपनी कोणत्या अधिकाराने शेतकऱ्यांचे आयडी बनवत आहे आणि त्यांच्याकडे ही माहिती पोहोचलीच कशी, असा सवाल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. ही सरळ सरळ शेतकऱ्यांच्या डेटाची लूट असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे काळाची गरज आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पावले उचलली पाहिजेत!1
- केंद्र व राज्य शासनाच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ आज राजुरा येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे हे आंदोलन पार पडले. यानंतर संविधान चौक ते तहसील कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी जोरदार नारेबाजी करीत शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविण्यात आले व समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली. गॅस दरवाढ व वाढत्या महागाईविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाच्या वेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शेतकरी व कामगार वर्गाचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे सामान्य जनतेसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर व राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी सांगितले की, शासनाने तात्काळ गॅस व इंधन दरवाढ मागे घ्यावी, कृत्रिम तुटवडा थांबवावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेस मार्फत जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.1