इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स वतीने अभियंता दिन व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न बारामती : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बारामती लोकल सेंटर यांच्या वतीने 15 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल सिटी इन येथे आयोजित करण्यात आलेला अभियंता दिन व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुणे,फलटण,इंदापूर, लोणंद, पुरंदर, दौंड, श्रीगोंदा, तसेच परिसरातील अनेक अभियंत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील व राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी इंजी. शामराव राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर इंजी. शहाजी पारकळे यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. त्यांच्या दूरदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्य आणि देशाच्या विकासातील मोलाच्या योगदानाची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या तांत्रिक सत्रात प्रख्यात शास्त्रज्ञ व सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. हेमंत धोंडे यांनी "Failure case Studies in Construction With Innovative Solutions" या विषयावर मार्गदर्शन केले. विविध बांधकामांमधील तांत्रिक त्रुटी, त्यामागील कारणे, त्यांचे परिणाम तसेच योग्य अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करून अशा समस्या कशा टाळता येतात याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या व व्यावहारिक पद्धतीने माहिती दिली. उपस्थित अभियंत्यांनी या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ISSE BLC टी-शर्टचे अनावरण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष इंजि. गणेश नरुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन डालमिया सिमेंट ग्रुप व ISSE BLC यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आला होता कार्यक्रमाची सांगता अभियंता दिन निमित्त केक कापून करण्यात आली. यामुळे उपस्थित सर्व अभियंत्यांना एक संस्मरणीय व आनंददायी अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल वाळके यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे सर्व सदस्य, पदाधिकारी, मान्यवर पाहुणे आणि सहभागी अभियंत्यांचे आभार *डॉ. गुणवंत काटे* यांनी केले.

- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.2
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1