परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश काकडे हे बुधवार १५ एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून खाजगी वाहनाने बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) व अन्य एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. यावेळी संबंधितांनी मोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाहनाच्या काचांवर जोरजोरात मारत तहसीलदारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. चांदणी नदीकडे जात असताना देखील संबंधितांनी गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. ‘मी दिलेल्या निवेदनावर कारवाई का केली नाही?’ असा जाब विचारत त्यांनी हुज्जत घालत तत्काळ कारवाई न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदारांकडे विविध विषयांवरील निवेदने नियमित येत असतात. संबंधित विषयानुसार ती निवेदने संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची प्रशासकीय पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारे असंविधानिक मार्गाचा अवलंब करत तालुका दंडाधिकाऱ्याला धमकावणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही तालुका दंडाधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याचा दाखला देत प्रत्येक तालुका दंडाधिकाऱ्याला कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.दरम्यान, परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार उपाध्यक्ष संतोष पाटील, नायब तहसीलदार महिला प्रतिनिधी विशाखा बलकवडे, नायब तहसीलदार, सचिव सचिन पाटील नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष महादेव शिंदे नायब तहसिलदार, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, , रणजितसिंह कोळेकर, जयवंत पाटील, हेमंत ढोकले, निलेश काकडे, दत्तात्रय गायकवाड व नायब तहसीलदार स्वामी जी. एस. , आर. एल. बंगाळे, पूजा गोरे, प्रियंका लोखंडे, विजयकुमार बाडकर, आदींच्या सह्या आहेत.
परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश काकडे हे बुधवार १५ एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून खाजगी वाहनाने बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) व अन्य एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. यावेळी संबंधितांनी मोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाहनाच्या काचांवर जोरजोरात मारत तहसीलदारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. चांदणी नदीकडे जात असताना देखील संबंधितांनी गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. ‘मी दिलेल्या निवेदनावर कारवाई का केली नाही?’ असा जाब विचारत त्यांनी हुज्जत घालत तत्काळ कारवाई न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला
आहे. तहसीलदारांकडे विविध विषयांवरील निवेदने नियमित येत असतात. संबंधित विषयानुसार ती निवेदने संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची प्रशासकीय पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारे असंविधानिक मार्गाचा अवलंब करत तालुका दंडाधिकाऱ्याला धमकावणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही तालुका दंडाधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याचा दाखला देत प्रत्येक तालुका दंडाधिकाऱ्याला कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.दरम्यान, परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार उपाध्यक्ष संतोष पाटील, नायब तहसीलदार महिला प्रतिनिधी विशाखा बलकवडे, नायब तहसीलदार, सचिव सचिन पाटील नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष महादेव शिंदे नायब तहसिलदार, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, , रणजितसिंह कोळेकर, जयवंत पाटील, हेमंत ढोकले, निलेश काकडे, दत्तात्रय गायकवाड व नायब तहसीलदार स्वामी जी. एस. , आर. एल. बंगाळे, पूजा गोरे, प्रियंका लोखंडे, विजयकुमार बाडकर, आदींच्या सह्या आहेत.
- लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे1
- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.4
- Post by Karan1
- Post by Digital media.1
- 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ1