बुलडाणा /लोकसेवा हक्क दिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव बुलढाणा,दि.29 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित मुदतीत आणि मुदतीपूर्वी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी व उकृष्ट सेवा देणारे पदनिर्देशित अधिकारी उपविभागीय कार्यालय बुलढाणा, खामगाव व सिंदखेड राजा, तसेच चिखली, नांदुरा, मलकापुर, संग्रामपुर तहसील मधील अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्युत निरीक्षक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, अजिंक्य घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ.रामेश्वर पूरी, शरद पाटील तसेच सर्व अधिकारी, कर्मचारीउपस्थित होते. लोकसेवा हक्क दिनी चिखली तहसील कार्यालयाचा गौरव चिखली तहसील कार्यालयाने नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील नागरिकांना 98.27 टक्के सेवा वेळेत पुरविण्यात आल्या असून, हे यश प्रशासकीय कार्यक्षमतेचे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे. विशेष बाब म्हणजे, हे अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ व समर्पित प्रयत्नांमुळे चिखली तहसील कार्यालयाने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते नायब तहसीलदार हरी ज्ञानदेव वीर आणि महसूल सहाय्यक हरिदास थोलबरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये तहसील कार्यालयामार्फत 65 हजारांहून अधिक दाखले वितरित करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साध्य झाले आहे. चिखली तहसील कार्यालयाची ही कामगिरी लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचा उत्कृष्ट आदर्श ठरली आहे. 0000000
बुलडाणा /लोकसेवा हक्क दिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव बुलढाणा,दि.29 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित मुदतीत आणि मुदतीपूर्वी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी व उकृष्ट सेवा देणारे पदनिर्देशित अधिकारी उपविभागीय कार्यालय बुलढाणा, खामगाव व सिंदखेड राजा, तसेच चिखली, नांदुरा, मलकापुर, संग्रामपुर तहसील मधील अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्युत निरीक्षक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, अजिंक्य घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ.रामेश्वर पूरी, शरद पाटील तसेच सर्व अधिकारी, कर्मचारीउपस्थित होते. लोकसेवा हक्क दिनी चिखली तहसील कार्यालयाचा
गौरव चिखली तहसील कार्यालयाने नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील नागरिकांना 98.27 टक्के सेवा वेळेत पुरविण्यात आल्या असून, हे यश प्रशासकीय कार्यक्षमतेचे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे. विशेष बाब म्हणजे, हे अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ व समर्पित प्रयत्नांमुळे चिखली तहसील कार्यालयाने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते नायब तहसीलदार हरी ज्ञानदेव वीर आणि महसूल सहाय्यक हरिदास थोलबरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये तहसील कार्यालयामार्फत 65 हजारांहून अधिक दाखले वितरित करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साध्य झाले आहे. चिखली तहसील कार्यालयाची ही कामगिरी लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचा उत्कृष्ट आदर्श ठरली आहे. 0000000
- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...1
- Post by Raghunath Aghao1
- जामनेर1