*द्वारका माई संगीत महफिल ग्रुपचा आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम : वाढदिवस साजरा झाला झोपडपट्टीतील गरजूंच्या सेवेतून* *कारंजा (लाड) :* वाढदिवस म्हणजे केक,पार्टी आणि सेलिब्रेशन हे समीकरण मोडीत काढत, द्वारका माई संगीत महेफिल ग्रुप, कारंजा तर्फे एक हृदयस्पर्शी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम पार पडला. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. कुंदन शामसुंदर यांच्या अर्धांगिनी सौ. छायाताई शामसुंदर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 ऑगस्ट रोजी शहराबाहेरील भटक्या विमुक्तांच्या पालावर आणि झोपडपट्टी वस्तीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात झोपडपट्टीतील लहान बालके, महिला, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिक अशा सर्वांची डॉ. कुंदन शामसुंदर आणि डॉ. आशिष सावजी यांनी सविस्तर आरोग्य तपासणी केली.लहान बालकांना जंतनाशक औषध, व्हिटॅमिन सिरप आणि खाऊचे वाटप करण्यात आले.महिलांसाठी कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या व सिरपचे वाटप करण्यात आले.वयोवृद्धांसाठी सांधेदुखीवरील ऑइल, जखमांसाठी अँटीबायोटिक क्रीम आणि इतर आवश्यक औषधी देण्यात आल्या.उपस्थित सर्व महिला-पुरुषांना गरजेनुसार मोफत औषधी देण्यात आल्या. या सेवाभावी उपक्रमाचे सर्वात भावनिक क्षण म्हणजे, सौ. छायाताईं श्यामसुंदर यांनी तेथील दोन गरजू महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित केले. त्यावेळी त्या महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून भारावून जात सौ. छायाताई म्हणाल्या, "आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस सार्थकी झाला. या माय-माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट आहे." यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. कुंदन शामसुंदर, डॉ. आशिष सावजी, नायब तहसीलदार महेंद्र खरतडे, देवेंद्र मुकुंद, सुधीर नखाते साहेब, संजय सांगळे साहेब, नंदकिशोर कव्हळकर, शिवाजीराव गायकवाड, सिद्धू नवघरे, सौ. छायाताई शामसुंदर, सौ आशाताई कव्हळकर,दीपा पवार, कुलश्री सावजी, पल्लवी नवघरे, माया धोटे, अर्चना कदम आणि कामाक्षी सोने आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील दुःखी कष्टी जीवांचे अश्रू पुसण्यासाठी,पुढील काळातही द्वारका माई संगीत महफिल ग्रुपच्या वतीने असे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातील, निराधारांना आधार, दिव्यांगाना काठी,वयोवृद्धाची सेवा व त्यांचा मोफत औषधोपचाराची सुविधा केली जाईल.असा मानस अध्यक्ष डॉ. कुंदन शामसुंदर यांनी यावेळी व्यक्त केला.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी कडून मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवले. या अनोख्या वाढदिवस सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*द्वारका माई संगीत महफिल ग्रुपचा आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम : वाढदिवस साजरा झाला झोपडपट्टीतील गरजूंच्या सेवेतून* *कारंजा (लाड) :* वाढदिवस म्हणजे केक,पार्टी आणि सेलिब्रेशन हे समीकरण मोडीत काढत, द्वारका माई संगीत महेफिल ग्रुप, कारंजा तर्फे एक हृदयस्पर्शी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम पार पडला. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. कुंदन शामसुंदर यांच्या अर्धांगिनी सौ. छायाताई शामसुंदर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 ऑगस्ट रोजी शहराबाहेरील भटक्या विमुक्तांच्या पालावर आणि झोपडपट्टी वस्तीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात झोपडपट्टीतील लहान बालके, महिला, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिक अशा सर्वांची डॉ. कुंदन शामसुंदर आणि डॉ. आशिष सावजी यांनी सविस्तर आरोग्य तपासणी केली.लहान बालकांना जंतनाशक औषध, व्हिटॅमिन सिरप आणि खाऊचे वाटप करण्यात आले.महिलांसाठी कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या व सिरपचे वाटप करण्यात आले.वयोवृद्धांसाठी सांधेदुखीवरील ऑइल, जखमांसाठी अँटीबायोटिक क्रीम आणि इतर आवश्यक औषधी देण्यात आल्या.उपस्थित सर्व महिला-पुरुषांना गरजेनुसार मोफत औषधी देण्यात आल्या. या सेवाभावी उपक्रमाचे सर्वात भावनिक क्षण म्हणजे, सौ. छायाताईं श्यामसुंदर यांनी तेथील दोन
गरजू महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित केले. त्यावेळी त्या महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून भारावून जात सौ. छायाताई म्हणाल्या, "आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस सार्थकी झाला. या माय-माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट आहे." यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. कुंदन शामसुंदर, डॉ. आशिष सावजी, नायब तहसीलदार महेंद्र खरतडे, देवेंद्र मुकुंद, सुधीर नखाते साहेब, संजय सांगळे साहेब, नंदकिशोर कव्हळकर, शिवाजीराव गायकवाड, सिद्धू नवघरे, सौ. छायाताई शामसुंदर, सौ आशाताई कव्हळकर,दीपा पवार, कुलश्री सावजी, पल्लवी नवघरे, माया धोटे, अर्चना कदम आणि कामाक्षी सोने आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील दुःखी कष्टी जीवांचे अश्रू पुसण्यासाठी,पुढील काळातही द्वारका माई संगीत महफिल ग्रुपच्या वतीने असे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातील, निराधारांना आधार, दिव्यांगाना काठी,वयोवृद्धाची सेवा व त्यांचा मोफत औषधोपचाराची सुविधा केली जाईल.असा मानस अध्यक्ष डॉ. कुंदन शामसुंदर यांनी यावेळी व्यक्त केला.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी कडून मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवले. या अनोख्या वाढदिवस सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.1
- हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।1
- मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.1
- दर्यापूरच्या विविध मागण्यांसाठी ओम राणेंची मंत्रालयाकडे सायकलवारी निवेदनांना दाद न मिळाल्याने थेट मंत्रालय गाठण्याचा निर्णय; शिक्षण, शैक्षणिक इमारत आणि ट्रॉमा सेंटरसह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा1
- मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन1
- राजकमल चौकातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्सवर मनपाची कारवाई1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1
- चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1