logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

थंडीची चाहूल, पडतेय दाट धुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल थंडीची चाहूल, पडतेय दाट धुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे. सकाळी सत्रात सर्वत्र दाट धुके पसरत असून, हवेतही काहीसा गारवा जाणवू लागल्याने वातावरणात अल्हाददायकता निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे अद्याप पावसाळा पूर्णपणे संपून आता हिवाळा सुरू होतो की काय, अशी नवी चाहूल नागरिकांना लागली आहे.

1 hr ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago
bd3290f0-f623-4a4f-9525-4a1d312c1f03

थंडीची चाहूल, पडतेय दाट धुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल थंडीची चाहूल, पडतेय दाट धुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे. सकाळी सत्रात सर्वत्र दाट धुके पसरत असून, हवेतही काहीसा गारवा जाणवू लागल्याने वातावरणात अल्हाददायकता निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे अद्याप पावसाळा पूर्णपणे संपून आता हिवाळा सुरू होतो की काय, अशी नवी चाहूल नागरिकांना लागली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* प्रतिनिधी स्वाती हडकर *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* *रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.* पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो." १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.
    1
    *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक*

प्रतिनिधी स्वाती हडकर
*‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक*
*रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.*
पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो."
१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.
    user_प्रतिनिधी : स्वाती हडकर
    प्रतिनिधी : स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.
    1
    भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 
विक्रम शिंदे /भोर दि. 17
भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    1
    कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण.
सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला;  
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून  धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले .
सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील ,  पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह  श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून  तपास यंत्रणा गतिमान  करण्यात आली आहे.
दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जनतेसाठी लढणारे एक अभ्यासक नेतृत्व मा.रोहितदादा पवार.
    1
    जनतेसाठी लढणारे एक अभ्यासक नेतृत्व  मा.रोहितदादा पवार.
    user_Bhagawanbaba
    Bhagawanbaba
    कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ कृतज्ञता सदगुरुराया, तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    1
    डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ  
कृतज्ञता सदगुरुराया, 
तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    3
    खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली

प्रतिनिधी/स्वाती हडकर 

खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली
प्रतिनिधी/स्वाती हडकर 
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_प्रतिनिधी : स्वाती हडकर
    प्रतिनिधी : स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.