logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ घोषीत; तिसगाव, शिंगवे व कानडगाव ग्रामपंचायतींचा समावेश राज्यातील महिला व बालकांचे सबलीकरण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. सदर आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्‍या ग्रामपंचायतींना महिला व बालविकास विभागाच्या वतीने सन २०२५-२०२६ चे तालुकास्तरीय ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चांदवड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींनी घवघवीत यश संपादन करत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायतीने प्रथम, शिंगवे ग्रामपंचायतीने द्वितीय, तर कानडगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या ग्रामपंचायतींनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, पोषण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामविकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘आदिशक्ती अभियान’ यशस्वीपणे राबविल्याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडून शुक्रवारी (दि. ३१) शासननिर्णय निर्गमित करून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

1 hr ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago

चांदवड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ घोषीत; तिसगाव, शिंगवे व कानडगाव ग्रामपंचायतींचा समावेश राज्यातील महिला व बालकांचे सबलीकरण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. सदर आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्‍या ग्रामपंचायतींना महिला व बालविकास विभागाच्या वतीने सन २०२५-२०२६ चे तालुकास्तरीय ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चांदवड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींनी घवघवीत यश संपादन करत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायतीने प्रथम, शिंगवे ग्रामपंचायतीने द्वितीय, तर कानडगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या ग्रामपंचायतींनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, पोषण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामविकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘आदिशक्ती अभियान’ यशस्वीपणे राबविल्याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडून शुक्रवारी (दि. ३१) शासननिर्णय निर्गमित करून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • करंजवण धरण 90 टक्के भरले.. :- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..
    1
    करंजवण धरण 90 टक्के भरले..
:- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास  कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण  थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    38 min ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. ​लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. ​तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. ​प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले.
​लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे.
​तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    1
    वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • काळ्या बाजारातील १९ लाखांचा युरिया जप्त; दोघांना अटक...... निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया लासलगाव पोलिसांनी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर परिसरात युरियाचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लासलगाव पोलीस आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.
    4
    काळ्या बाजारातील १९ लाखांचा युरिया जप्त; दोघांना अटक......
निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया लासलगाव पोलिसांनी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर परिसरात युरियाचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लासलगाव पोलीस आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली.
भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत..... वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    1
    ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.....
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला.
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! Dhule News | धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #dhulemahanagarpalika #maharashtranews
    1
    धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी!
Dhule News | धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी!
-
#dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #dhulemahanagarpalika #maharashtranews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांचे पथक व चांदवड पोलिसांची धडक कारवाई:* *चांदवड टोलनाक्यावर लाखो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, आरोपी किया गाडीसह ताब्यात* ​ प्रतिनिधी, चांदवड चांदवड : मुंबईहून मालेगावच्या दिशेने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्कराला चांदवड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुप्त माहितीच्या आधारे चांदवड टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एमडी (Mephedrone) ड्रग्जचा माल जप्त केला असून किया कार क्रमांक एम .एच एक्केचाळीस बी एल सत्तावीस वीस या वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ​ ​ मुंबईहून मालेगावच्या दिशेने एका संशयित किया कारमधून काही प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळाली होती. माहिती मिळताच चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांच्या पोलीस पथकाने व चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने चांदवड टोलनाक्यावर तात्काळ नाकाबंदी केली आणि संशयित गाडी अडवली. ​ गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले 'एमडी ड्रग्ज' आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज आणि वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले.सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकात पोलीस निरीक्षक कैलास वाघ, भाऊसाहेब गुळे, विक्रम बस्ते, स्वप्निल रंधे, स्वप्निल जाधव, सुनील जाधव, अमोल जाधव, . दिनेश सूळ, प्रदीप आजगे,शंकर पवार यांचा समावेश होता ​ चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी सध्या घटनास्थळीच रीतसर पंचनामा करत असून ड्रग्जचे नेमके वजन आणि बाजारभाव निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ​या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का? याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
    1
    *अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांचे पथक व चांदवड पोलिसांची धडक कारवाई:* 
*चांदवड टोलनाक्यावर लाखो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, आरोपी किया गाडीसह ताब्यात* 
​       प्रतिनिधी, चांदवड
चांदवड : मुंबईहून मालेगावच्या दिशेने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्कराला चांदवड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुप्त माहितीच्या आधारे चांदवड टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एमडी (Mephedrone) ड्रग्जचा माल जप्त केला असून किया कार क्रमांक एम .एच एक्केचाळीस बी एल सत्तावीस वीस या वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
​
​ मुंबईहून मालेगावच्या दिशेने एका संशयित किया कारमधून काही प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळाली होती.
माहिती मिळताच चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांच्या पोलीस पथकाने व चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने चांदवड टोलनाक्यावर तात्काळ नाकाबंदी केली आणि संशयित गाडी अडवली.
​ गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले 'एमडी ड्रग्ज' आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज आणि वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले.सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकात पोलीस निरीक्षक कैलास वाघ, भाऊसाहेब गुळे, विक्रम बस्ते, स्वप्निल रंधे, स्वप्निल जाधव, सुनील जाधव, अमोल जाधव, . दिनेश सूळ, प्रदीप आजगे,शंकर पवार यांचा समावेश होता
​ चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी सध्या घटनास्थळीच रीतसर पंचनामा करत असून ड्रग्जचे नेमके वजन आणि बाजारभाव निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
​या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का? याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.