logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, राज्यात खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ता वसुली पोहोचते, ज्यामुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. याच कारणामुळे राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा, गांजाची विक्री, तसेच हातभट्ट्या आणि विषारी दारूचे थैमान सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळेच पुण्यात विषारी दारूने २२ निष्पाप लोकांचा बळी घेतला असून, राज्याचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवत असल्यामुळे सर्वत्र बेबंदशाही माजल्याचा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीचे प्रायश्चित्त घेऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी केली. पुण्यातील विषारी दारूमुळे २२ जणांचा बळी गेल्यानंतरच सरकारला जाग आली असून, आता हातभट्ट्या तोडण्याची कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिल्या नसून, राज्यात ५०० शहरे आणि ४३ हजार गावखेड्यांमध्ये अवैध धंदे आणि हातभट्ट्या राजरोस सुरू आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, ‘जामतारा’सारखी प्रकरणे आणि अवैध धंद्यांची रॅकेट्स गृहविभागाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्यच बदलल्याचे सांगत, पुण्यातील प्रकरणामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असल्याने आता स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी कारवाईचे नाटक केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला. तो मृतदेह त्याच मुलीचा आहे असे समजून पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या वडील आणि भावाला अटक करून बेदम मारहाण केली. त्यांच्याकडून कबुलीजबाब घेऊन पोलिसांनी ४८ तासांत प्रकरण सोडवल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता मुलगी समोर आली. पोलिसांनी कशाचीही शहानिशा न करता हे प्रकरण हाताळले असून, हा सर्व प्रकार ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखा असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. महाराष्ट्रात पोलीस विभागाचे काम असेच चालत असल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण दिल्याचे जाहीर करून गुलाल उधळला होता. त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, ते जाहीर करावे अशी मागणी सपकाळ यांनी केली. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी, ज्यामुळे मराठा समाजासह सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यामुळेच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज आणि विषारी दारूचे थैमान माजले आहे, असे सपकाळ यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

1 hr ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
1 hr ago
7ab46f96-e4f2-41bd-aa2f-194abf780013

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला, रत्नागिरी कोकणातील गोपालगड, 1960 साली अक्षरशः विकण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या कृत्याला 'पाप' असे संबोधण्यात आले असून, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात हे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे रहस्य 1960 साली घडले असले तरी, ते आता उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात पडलेले दोन आंबे उचलण्यासाठी एक व्यक्ती गेला असता हे गंभीर प्रकरण समोर आल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला अक्षरशः विकल्याचे म्हटले आहे. या गंभीर प्रकरणावर सरकारने लक्ष देऊन काय खरे आहे आणि काय खोटे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील सत्य शोधून ते प्रसारमाध्यमांना, संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत देशाला कळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला, रत्नागिरी कोकणातील गोपालगड, 1960 साली अक्षरशः विकण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या कृत्याला 'पाप' असे संबोधण्यात आले असून, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात हे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचे रहस्य 1960 साली घडले असले तरी, ते आता उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात पडलेले दोन आंबे उचलण्यासाठी एक व्यक्ती गेला असता हे गंभीर प्रकरण समोर आल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला अक्षरशः विकल्याचे म्हटले आहे.

या गंभीर प्रकरणावर सरकारने लक्ष देऊन काय खरे आहे आणि काय खोटे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील सत्य शोधून ते प्रसारमाध्यमांना, संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत देशाला कळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हरियाणातील पंचकुला येथे 'सनातन साउंड्स विथ मीमा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३० मे २०२६ रोजी पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील इंद्रधनुष सभागृहात संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून सुरू होईल.
    1
    हरियाणातील पंचकुला येथे 'सनातन साउंड्स विथ मीमा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३० मे २०२६ रोजी पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील इंद्रधनुष सभागृहात संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून सुरू होईल.
    user_Surendra K. S. Chowdhary
    Surendra K. S. Chowdhary
    Artist Mumbai, Maharashtra•
    9 hrs ago
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 'विकास' आणि 'राजकारण' या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली, तसेच विरोधकांवर थेट हल्लाबोल करत आपली भूमिका स्पष्ट केली.
    1
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 'विकास' आणि 'राजकारण' या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली, तसेच विरोधकांवर थेट हल्लाबोल करत आपली भूमिका स्पष्ट केली.
    user_News Vani
    News Vani
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • एका कष्टकरी आईच्या अविश्वसनीय जिद्दीची गोष्ट समोर आली आहे, जिथे ती आपल्या बाळाला कडेवर घेऊन कॅमेऱ्यामागे उभी राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या या अदम्य इच्छाशक्तीमुळे आणि मेहनतीमुळे तिला खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ असे संबोधले जात आहे. ही दृष्ये एका मातेची चिकाटी आणि समर्पण दर्शवतात, जी मुलाची जबाबदारी सांभाळत कामाप्रती आपली निष्ठा कायम ठेवते.
    1
    एका कष्टकरी आईच्या अविश्वसनीय जिद्दीची गोष्ट समोर आली आहे, जिथे ती आपल्या बाळाला कडेवर घेऊन कॅमेऱ्यामागे उभी राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या या अदम्य इच्छाशक्तीमुळे आणि मेहनतीमुळे तिला खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ असे संबोधले जात आहे. ही दृष्ये एका मातेची चिकाटी आणि समर्पण दर्शवतात, जी मुलाची जबाबदारी सांभाळत कामाप्रती आपली निष्ठा कायम ठेवते.
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुंबईतील बायकुला येथील केला मार्केटमधील हलवा पराठाच्या दुकानात आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक व्यक्ती जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बायकुला पोलीस पथक आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले.
    1
    मुंबईतील बायकुला येथील केला मार्केटमधील हलवा पराठाच्या दुकानात आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक व्यक्ती जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बायकुला पोलीस पथक आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले.
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.