logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ताम्हिणी घाटातील महिलेच्या हत्येचा छडा; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद माणगाव (रायगड) - ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे ताम्हिणी घाटातील या हत्येचे गूढ उलगडले आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी माणगाव पोलिसांना ताम्हिणी घाट परिसरातील मोजे कोंढेधर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत असलेल्या दरीत २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर तपासातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक तपासासह उपलब्ध माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मृत महिला ही सुमन गोपाळ यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रजापती (२४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (२७), दोघेही चिखली, पुणे येथील रहिवासी, यांच्यावर संशय घेतला. पोलिसांनी संशयितांच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेले. तेथे ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह घाटातील दरीत फेकून दिल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोन्ही संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

17 hrs ago
user_Raigad news
Raigad news
अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
17 hrs ago
3629bd25-4f79-4c40-bbda-3883e1ee0aa9

ताम्हिणी घाटातील महिलेच्या हत्येचा छडा; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद माणगाव (रायगड) - ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे ताम्हिणी घाटातील या हत्येचे गूढ उलगडले आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी माणगाव पोलिसांना ताम्हिणी घाट परिसरातील मोजे कोंढेधर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत असलेल्या दरीत २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर तपासातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक तपासासह उपलब्ध माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मृत महिला ही सुमन गोपाळ यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रजापती (२४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (२७), दोघेही चिखली, पुणे येथील रहिवासी, यांच्यावर संशय घेतला. पोलिसांनी संशयितांच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेले. तेथे ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह घाटातील दरीत फेकून दिल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोन्ही संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १५ कोटींचा खर्च, तरी जिल्हा रुग्णालयाची‘नस’ नाजूकच! आग, स्लॅब अन् ५१ टक्के रिक्त पदे; दुर्घटनांचे इशारे मिळूनही ‘सेफ्टी सिस्टम’ अपूर्णच रायगड : रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही, तर दुसरीकडे मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च, तरी सिव्हिलची नाडी कमकुवतच’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची सुरक्षितता ही रुग्णालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या यंत्रणेचे नियमित विद्युत ऑडिट झाले आहे का, शेवटची तपासणी कधी झाली आणि त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात आल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनांचे इशारे; तरी प्रशासन सुस्त? सिव्हिल रुग्णालयात सुरक्षेच्या प्रश्नावर यापूर्वीही धोक्याचे इशारे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता. या घटनांनंतरही रुग्णालयाच्या सुरक्षेचे सर्वंकष परीक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग सिव्हिलचे विद्युत ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. सिव्हिलमध्ये ५१ टक्के पदे रिक्त रुग्णालयाच्या सुरक्षेबरोबरच मनुष्यबळाची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. विविध संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच रुग्णालयातील सुमारे ५१ टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. मनोविकृती परिचारिका, वरिष्ठ लिपिक आणि इतर संवर्गातीलही पदे रिक्त आहेत. रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादक्षमता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘सेफ्टी सिस्टम’ पूर्ण करण्याची मागणी रुग्णालयातील विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीची सुरक्षितता यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात. तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामे करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ कोटींच्या खर्चानंतरही सिव्हिलची ‘नाडी’ कमकुवत का राहिली, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे. यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, नगर सेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.
    4
    १५ कोटींचा खर्च, तरी जिल्हा रुग्णालयाची‘नस’ नाजूकच!

आग, स्लॅब अन् ५१ टक्के रिक्त पदे; दुर्घटनांचे इशारे मिळूनही ‘सेफ्टी सिस्टम’ अपूर्णच

रायगड : 
रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही, तर दुसरीकडे मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च, तरी सिव्हिलची नाडी कमकुवतच’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची सुरक्षितता ही रुग्णालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या यंत्रणेचे नियमित विद्युत ऑडिट झाले आहे का, शेवटची तपासणी कधी झाली आणि त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात आल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुर्घटनांचे इशारे; तरी प्रशासन सुस्त?
सिव्हिल रुग्णालयात सुरक्षेच्या प्रश्नावर यापूर्वीही धोक्याचे इशारे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता.
या घटनांनंतरही रुग्णालयाच्या सुरक्षेचे सर्वंकष परीक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग सिव्हिलचे विद्युत ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
सिव्हिलमध्ये ५१ टक्के पदे रिक्त
रुग्णालयाच्या सुरक्षेबरोबरच मनुष्यबळाची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. विविध संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच रुग्णालयातील सुमारे ५१ टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. मनोविकृती परिचारिका, वरिष्ठ लिपिक आणि इतर संवर्गातीलही पदे रिक्त आहेत.
रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता
मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादक्षमता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
‘सेफ्टी सिस्टम’ पूर्ण करण्याची मागणी
रुग्णालयातील विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीची सुरक्षितता यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात. तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामे करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ कोटींच्या खर्चानंतरही सिव्हिलची ‘नाडी’ कमकुवत का राहिली, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे.
यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, नगर सेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान
    1
    मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान
मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨ नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨
    1
    नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨
नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नेपाल की बारिश ने बढ़ाई बिहार की धड़कनें… नदियां उफान पर, बाढ़ का खतरा मंडराया!” नेपाल में कुदरत का कहर! बिहार पर मंडराया बाढ़ का खतरा, नदियों का जलस्तर बढ़ा पटना/बिहार। नेपाल में लगातार हो रही भारी बारिश के बीच नदियों के जलस्तर में बढ़ोतरी से बिहार में बाढ़ का खतरा गहराने लगा है। नेपाल से आने वाले पानी के कारण गंडक, कोसी, बागमती और कमला बलान जैसी नदियों के उफान पर आने की आशंका ने सीमावर्ती इलाकों में चिंता बढ़ा दी है। कई निचले इलाकों में जलभराव की स्थिति बनने लगी है। नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की जा रही है। हालात बिगड़े तो कई इलाकों में बाढ़ का संकट और गहरा सकता है। प्रशासन और राहत-बचाव एजेंसियों को अलर्ट रहने की जरूरत है। अपील: नदी, बांध और निचले इलाकों के आसपास जाने से बचें। अफवाहों पर ध्यान न दें और किसी भी आपात स्थिति में स्थानीय प्रशासन से संपर्क करे
    2
    नेपाल की बारिश ने बढ़ाई बिहार की धड़कनें… नदियां उफान पर, बाढ़ का खतरा मंडराया!”
नेपाल में कुदरत का कहर! बिहार पर मंडराया बाढ़ का खतरा, नदियों का जलस्तर बढ़ा
पटना/बिहार। नेपाल में लगातार हो रही भारी बारिश के बीच नदियों के जलस्तर में बढ़ोतरी से बिहार में बाढ़ का खतरा गहराने लगा है। नेपाल से आने वाले पानी के कारण गंडक, कोसी, बागमती और कमला बलान जैसी नदियों के उफान पर आने की आशंका ने सीमावर्ती इलाकों में चिंता बढ़ा दी है।
कई निचले इलाकों में जलभराव की स्थिति बनने लगी है। नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की जा रही है।
हालात बिगड़े तो कई इलाकों में बाढ़ का संकट और गहरा सकता है। प्रशासन और राहत-बचाव एजेंसियों को अलर्ट रहने की जरूरत है।
अपील: नदी, बांध और निचले इलाकों के आसपास जाने से बचें। अफवाहों पर ध्यान न दें और किसी भी आपात स्थिति में स्थानीय प्रशासन से संपर्क करे
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • JaiBhimApp - Play store Stickers and Wallpaper App – +500 बाबासाहेब और सामाजिक समानता के संदेशों को डिजिटल माध्यम से आगे बढ़ाना चाहते हैं, तो आज ही JaiBhimApp डाउनलोड करें।
    1
    JaiBhimApp - Play store Stickers and Wallpaper App – +500
बाबासाहेब और सामाजिक समानता के संदेशों को डिजिटल माध्यम से आगे बढ़ाना चाहते हैं, तो आज ही JaiBhimApp डाउनलोड करें।
    user_JaiBhimApp
    JaiBhimApp
    Classified ads newspaper publisher Kurla, Mumbai Suburban•
    4 hrs ago
  • भारताचे असे पंतप्रधान ज्यांनी देशासाठी काहीतरी मिळवून दिले आहे. भारताला असे एक पंतप्रधान लाभले होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या स्मरणात राहील असे काहीही निर्माण केले नाही; उलट, जे काही उभारले गेले होते, ते सर्व विकून टाकण्यात आले.
    1
    भारताचे असे पंतप्रधान ज्यांनी देशासाठी काहीतरी मिळवून दिले आहे.
भारताला असे एक पंतप्रधान लाभले होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या स्मरणात राहील असे काहीही निर्माण केले नाही; उलट, जे काही उभारले गेले होते, ते सर्व विकून टाकण्यात आले.
    user_Tiger News Marathi
    Tiger News Marathi
    Local News Reporter मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांचा जल्लोष! | मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार मुंबई, महाराष्ट्रात अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
    1
    अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांचा जल्लोष! | मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार
मुंबई, महाराष्ट्रात अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना, कहा—उनका सहयोग अमूल्य सांस्कृतिक और पारंपरिक पर्व रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र के प्रमुख नेता और मंत्री आशीष शेलार ने समाज सेवा में जुटी महिलाओं के प्रति अपना आभार व्यक्त किया है। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि हमारी परंपराओं में रक्षाबंधन का पर्व भाई-बहन के पवित्र प्रेम और अटूट बंधन को व्यक्त करने का एक बेहद महत्वपूर्ण माध्यम है।
    1
    मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना
मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना, कहा—उनका सहयोग अमूल्य
सांस्कृतिक और पारंपरिक पर्व रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र के प्रमुख नेता और मंत्री आशीष शेलार ने समाज सेवा में जुटी महिलाओं के प्रति अपना आभार व्यक्त किया है। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि हमारी परंपराओं में रक्षाबंधन का पर्व भाई-बहन के पवित्र प्रेम और अटूट बंधन को व्यक्त करने का एक बेहद महत्वपूर्ण माध्यम है।
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.