क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त शिरूर येथे अभिवादन सभा. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिवादन शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम, २४} क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांमुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज त्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, असे प्रतिपादन शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती आयेशा सय्यद, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका सुनीता भुजबळ, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रविंद्र सानप, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मिठू गदादे, राजेंद्र खेतमाळीस, रवि लेंडे, प्रवीण मुथा, आनंद भुजबळ, योगेश जामदार, राजू होले, बाळासाहेब झाडगे, राजेंद्र जाधव, बंडू जगताप, डॉ. वैशाली साखरे, गोपीनाथ पठारे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाचर्णे म्हणाल्या, की कामाच्या माध्यमातून शिरूर शहर अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विचारांमुळे महिलांना समाजात सक्षमपणे उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. महापुरुषांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करत प्रत्येक पुरुषाने महिलांना प्रोत्साहन व सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र सानप यांनी केले. यावेळी सभापती डॉ. सुनीता पोटे, आयेशा सय्यद, संजय बारवकर, सागर नरवडे तसेच प्रा. सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिठू गदादे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिबूब सय्यद यांनी मानले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त शिरूर येथे अभिवादन सभा. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिवादन शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम, २४} क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांमुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज त्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, असे प्रतिपादन शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती आयेशा सय्यद, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका सुनीता भुजबळ, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रविंद्र सानप, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय
बारवकर, मिठू गदादे, राजेंद्र खेतमाळीस, रवि लेंडे, प्रवीण मुथा, आनंद भुजबळ, योगेश जामदार, राजू होले, बाळासाहेब झाडगे, राजेंद्र जाधव, बंडू जगताप, डॉ. वैशाली साखरे, गोपीनाथ पठारे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाचर्णे म्हणाल्या, की कामाच्या माध्यमातून शिरूर शहर अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विचारांमुळे महिलांना समाजात सक्षमपणे उभे राहण्याची प्रेरणा
मिळाली आहे. महापुरुषांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करत प्रत्येक पुरुषाने महिलांना प्रोत्साहन व सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र सानप यांनी केले. यावेळी सभापती डॉ. सुनीता पोटे, आयेशा सय्यद, संजय बारवकर, सागर नरवडे तसेच प्रा. सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिठू गदादे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिबूब सय्यद यांनी मानले.
- 🚨 महत्त्वाचे आवाहन: वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करा! 🚨 जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ✅ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? 🧢 उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधा किंवा टोपीचा आवर्जून वापर करा. 💧 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, ताक किंवा इतर द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. 👨🌾 विशेष लक्ष द्या: गरोदर माता, शेतकरी, कामगार आणि आजारी व्यक्तींनी वाढत्या उन्हाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 🏥 प्रशासनाची तयारी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) 'कूल रूम्स' (Cool Rooms) तयार करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ⚠️ लक्षात ठेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) कोणताही त्रास किंवा लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या! ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा. #Ahilyanagar #HeatwaveAlert #SummerSafety #CollectorAppeal #StayHydrated #Maharashtra #DrPankajAshiya #PublicHealth #StayCool1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी मुलै प्रियकरावर केला गुन्हा दाखल!1
- आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all1
- पिंपरी चिंचवड :- काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... : राजेंद्र बहिरट ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेवाडी ) #पिंपरीचिंचवड #काळेवाडी #बालसुरक्षा #लैंगिकअत्याचार #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #निर्भयमहाराष्ट्र #बालहक्क #कडककारवाई #सुरक्षितबालपण #PimpriChinchwad #Kalewadi #ChildSafety #CrimeNews #SexualAbuse #PoliceAction #JusticeForChild #StopChildAbuse #ProtectChildren #LawAndOrder1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by कर्जत लाईव्ह1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार1