91-मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारानी - सध्याच्या मतदार यादीतील नावाला यापूर्वी झालेल्या सन - 2002 (SIR) विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी Mapping करुन घ्यावेत – अनुप पाटील उपविभागीय अधिकारी, देगलुर 91-मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारानी - सध्याच्या मतदार यादीतील नावाला यापूर्वी झालेल्या सन - 2002 (SIR) विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी Mapping करुन घ्यावेत – अनुप पाटील उपविभागीय अधिकारी, देगलुर मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (SIR) महाराष्ट्र राज्यात माहे एप्रिल 2026 मध्ये सुरु होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 91- मुखेड विधानसभा मतदारसंघांतर्गत 366 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले असुन सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सदरील काम पुर्ण करण्यासाठी त्यांच्या शाळेतुन / कार्यालयातुन 24 दिवसापासुन सुट देण्यात आली आहे त्यांच्या अथक परिश्रमातुन आतापर्यंत 78% मतदाराचे सध्याच्या मतदार यादीतील नावाला यापूर्वी झालेल्या सन - 2002 (SIR) विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी Mapping काम पुर्ण झाले आहे. तरी उर्वरीत 22 % मतदारानी तातडीने आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क करुन आपल्या सध्याच्या मतदार यादीतील नावाशी Mapping करुन घ्यावेत. याबरोबरच मतदारयादीतील अस्पष्ट, आकार विरहित असलेल्या छायाचित्रांची दुरुस्ती मयत मतदाराच्या नोंदीची वगळणी करणे इत्यादी कामे केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत केले जात आहेत. विवाहीत महिलानी त्यांचे माहेरच्या गावातील त्यांचे आई,वडील,भाऊ, आजी, आजोबा यांचे सन 2002 च्या यादीचा भाग क्र. व अनु.क्र. आपले सासरकडील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना देवुन आपल्या सध्याच्या यादीतील नावाशी Mapping करुन घ्यावेत असे आवाहन मा.अनुप पाटील उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 91-मुखेड यांनी यावेळी तहसिलदार राजेश जाधव, नायब तहसिलदार सतीष जोहरे, प्र.सहायक महसुल अधिकारी संदिप भुरे, सुनिल कुलकर्णी (लिपीक) व डाटा एंन्ट्री आँपरेटर बबलु आतार हे उपस्थीत होते.

- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- Post by वैजनाथ पावडे1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1