उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी. नांदेड :- सध्या वाढत्या तापमानामुळे (Heat Wave परिस्थिती) दुपारी 12 ते सायं. 4 या वेळेत उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच कारखान्यातील, दुकानातील, हॉटेल्स मधील, खाद्यागृहे, आय टी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, किरकोळ विक्रीची दुकाने, एमआयडीसी मधील उद्योगातील कामगार व इतर ठिकाणी काम करण्याऱ्या कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व आस्थापनांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना तात्काळ राबविणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत कामगारांकडून कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करून घेण्यात येऊ नयेत, यास्वरूपाच्या कामाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा किंवा अशी कामे बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. कामगारांसाठी सावली (Shade), विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी स्वच्छ थंड व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता संबंधी सूचना तसेच आपत्कालीन नंबर स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय ठेऊन उष्माघात सारखी प्रकरणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याची सोय करावी. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सहायक कामगार आयुक्त आशिष दिलीप ढवळे यांनी दिला आहे.

- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.1