"अखिल विश्व कवेत घेती; असे तया अंगी मोठेपण"; वृंदा करमरकर "अखिल विश्व कवेत घेती; असे तया अंगी मोठेपण"; वृंदा करमरकर सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय, दगडाला देवपण येत नाही', ही म्हण शब्दशः खरी आहे. शिल्पकार दगडावर छिन्नी हातोड्यांनी घाव घालतो, त्यातून बनलेली मूर्ती देवालयात पुजली जाते. हिऱ्याला चमकण्यासाठी पैलू पाडून घ्यावे लागतात. सोने मुशीत तापवल्यावरच ते बावन्नकशी होते. वेदनेतून सृजन होते. 'तया अंगी मोठेपण' या उक्तीचा विचार करता असे लक्षात येते, ज्यांच्या अंगी खरे मोठेपण असते, त्यांना आयुष्यात अनेक संकटांना, अडचणींना आणि वेदनांना सामोरे जावे लागते. मोठेपण म्हणजे केवळ पैसा, पद किंवा प्रसिद्धी नव्हे, तर मनाची उदारता, सहनशीलता, त्यागाची वृत्ती आणि इतरांसाठी जगण्याची तयारी हेच खरे मोठेपण होय. इतिहासात आणि समाजातअशी अनेक उदाहरणे दिसतात. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य झोकून दिले. समाजाने तिरस्कृत केलेल्या लोकांसाठी त्यांनी आनंदवन उभे केले, पण त्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा दिली, तेथे अनेक अडचणी असूनही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी लढा दिला. समाजाच्या विरोधाला, अपमानाला न जुमानता त्यांनी शिक्षणाचा दीप चेतवला. सिंधूताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी आईची भूमिका निभावली, स्वतःच्या कठीण आयुष्यावर मात करून त्यांनी हजारो मुलांना आधार दिला. या सर्व व्यक्तींमध्ये एक समान गुण दिसतो; त्याग, धैर्य आणि निस्वार्थी सेवा. त्यांच्या आयुष्यातील यातना कठीण होत्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. म्हणूनच ते आज खऱ्या अर्थाने “मोठे” ठरतात. जे लोक स्वतः जळूनही इतरांना प्रकाश देतात,अपमान गिळूनही हसत राहतात,यश मिळाल्यावरही पाय जमिनीवर ठेवतात,अपयशाच्या राखेतून फिनिक्स सारखे पुन्हा उभं राहण्याची जिद्द ठेवतात, ते खऱ्या अर्थाने मोठे असतात. त्यांचे मन मोठे असल्यामुळे सारे जगही ते कवेत घेतात.अशा व्यक्तींच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणे असते. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धे साठी आदरणीय राहुल सरांनी "तया अंगी मोठेपण" हा वैचारिक विषय दिला. वेगवेगळे अर्थपूर्ण विषय देणे ही राहुलसरांची खासियत आहे. शिलेदारांनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल मी राहुलसरांची मनापासून आभारी आहे. वृंदा(चित्रा)करमरकर मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक सांगली जिल्हा सांगली ©मराठीचे शिलेदार समूह

- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1