नांदेड जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’; उष्णतेची लाट व वादळी पावसाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचा इशारा. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ नांदेड (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांच्या माहितीनुसार प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून १६ ते २० एप्रिल या कालावधीत नांदेड जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट तसेच मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून, १८ एप्रिल रोजी उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. १९ व २० एप्रिल रोजीही काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर आच्छादन ठेवणे, हलके कपडे वापरणे तसेच दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

- श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Today One Live1
- Post by M B B1
- Post by माधव गायकवाड4
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- Post by Today One Live1