logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिशक्ती पुरस्कारात राशा ग्रामपंचायतीची बाजी; सुरगाणा तालुक्यात तृतीय क्रमांक आदिशक्ती पुरस्कारात राशा ग्रामपंचायतीची बाजी; सुरगाणा तालुक्यात तृतीय क्रमांक महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'आदिशक्ती अभियान' अंतर्गत सन २०२५-२६ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय 'आदिशक्ती पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय पुरस्कारात तृतीय क्रमांक पटकावून तालुक्याचा गौरव वाढविला आहे. महिला व बाल विकास विभागाने दि. ३१ जुलै २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत राशा ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या यशामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून राशा ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

5 hrs ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

आदिशक्ती पुरस्कारात राशा ग्रामपंचायतीची बाजी; सुरगाणा तालुक्यात तृतीय क्रमांक आदिशक्ती पुरस्कारात राशा ग्रामपंचायतीची बाजी; सुरगाणा तालुक्यात तृतीय क्रमांक महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'आदिशक्ती अभियान' अंतर्गत सन २०२५-२६ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय 'आदिशक्ती पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय पुरस्कारात तृतीय क्रमांक पटकावून तालुक्याचा गौरव वाढविला आहे. महिला व बाल विकास विभागाने दि. ३१ जुलै २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत राशा ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या यशामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून राशा ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    1
    वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
    2
    टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; 
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    2
    येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशी | प्रतिनिधी सुभान शेख 
धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे.
2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल.
ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत.
ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    4
    चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास 
नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
    1
    खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप
नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    1
    दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून   २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात... - भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय... - गाडीतील सुज्ञ प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल... नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना वाहनचालक मात्र बिनधास्तपणे गाडी चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे..
    3
    मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात...

- भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय...
- गाडीतील सुज्ञ प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल...
नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना वाहनचालक मात्र बिनधास्तपणे गाडी चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे..
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.