logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चातारी सह मतखंडात दहा तासांत तब्बल १८ वेळा वीज गुल! महावितरणच्या लपंडावाने शेतकरी हैराण; कृषिपंप जळण्याची भीती — आंदोलनाचा इशारा उमरखेड :-चातारीसह मतखंड परिसरात महावितरणच्या विजेच्या लपंडावाने शेतकरी अक्षरशः हैराण झाले असून, बुधवारी( दि, १६) सकाळी ६ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अवघ्या दहा तासांच्या कालावधीत वारंवार वीज ये-जा होत राहिल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा नवा विक्रमच केल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून चातारी व मतखंड परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कधी पाऊस, कधी वारा तर कधी दुरुस्तीचे कारण सांगून तीन ते पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र बुधवारी परिस्थितीने कळस गाठला. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसह घरगुती वीज उपकरणांवरही परिणाम होत आहे. यासंदर्भात ब्राह्मणगाव, साखरा,ढाणकी तसेच उमरखेड येथील महावितरणच्या सबस्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र वीजपुरवठा वारंवार का खंडित होत आहे, याबाबत ठोस कारण किंवा तातडीची उपाययोजना सांगण्याऐवजी एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना कृषिपंपाद्वारे पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच काळात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार वीज ये-जा झाल्यामुळे व्होल्टेजमध्ये चढ-उतार होऊन कृषिपंप, मोटार तसेच अन्य विद्युत उपकरणे निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांचे कृषिपंप निकामी झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकृत वेळापत्रकानुसार तांत्रिक अडचणी असलेल्या कृषी फिडरवर तीन-फेज वीजपुरवठ्याचे नियोजन केले जाते. तसेच कंपनीकडून खंडित वीजपुरवठ्याची संख्या, कालावधी आणि कारणांची नोंद ठेवली जाते. त्यामुळे चातारी फिडरवर प्रत्यक्षात किती वेळा व किती कालावधीसाठी वीज खंडित झाली, याची अधिकृत नोंद तपासून दोषी यंत्रणा व तांत्रिक अडचणी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टी चे युवा नेतृत्व विद्वान केवटे व राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, चातारी परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरणकडून समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चातारी परिसरातील फिडरची तांत्रिक तपासणी करावी, वीजपुरवठ्याचे वेळापत्रक नियमित करावे आणि कृषिपंपांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

16 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
16 hrs ago

चातारी सह मतखंडात दहा तासांत तब्बल १८ वेळा वीज गुल! महावितरणच्या लपंडावाने शेतकरी हैराण; कृषिपंप जळण्याची भीती — आंदोलनाचा इशारा उमरखेड :-चातारीसह मतखंड परिसरात महावितरणच्या विजेच्या लपंडावाने शेतकरी अक्षरशः हैराण झाले असून, बुधवारी( दि, १६) सकाळी ६ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अवघ्या दहा तासांच्या कालावधीत वारंवार वीज ये-जा होत राहिल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा नवा विक्रमच केल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून चातारी व मतखंड परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कधी पाऊस, कधी वारा तर कधी दुरुस्तीचे कारण सांगून तीन ते पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र बुधवारी परिस्थितीने कळस गाठला. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसह घरगुती वीज उपकरणांवरही परिणाम होत आहे. यासंदर्भात ब्राह्मणगाव, साखरा,ढाणकी तसेच उमरखेड येथील महावितरणच्या सबस्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र वीजपुरवठा वारंवार का खंडित होत आहे, याबाबत ठोस कारण किंवा तातडीची उपाययोजना सांगण्याऐवजी एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना कृषिपंपाद्वारे पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच काळात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार वीज ये-जा झाल्यामुळे व्होल्टेजमध्ये चढ-उतार होऊन कृषिपंप, मोटार तसेच अन्य विद्युत उपकरणे निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांचे कृषिपंप निकामी झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकृत वेळापत्रकानुसार तांत्रिक अडचणी असलेल्या कृषी फिडरवर तीन-फेज वीजपुरवठ्याचे नियोजन केले जाते. तसेच कंपनीकडून खंडित वीजपुरवठ्याची संख्या, कालावधी आणि कारणांची नोंद ठेवली जाते. त्यामुळे चातारी फिडरवर प्रत्यक्षात किती वेळा व किती कालावधीसाठी वीज खंडित झाली, याची अधिकृत नोंद तपासून दोषी यंत्रणा व तांत्रिक अडचणी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टी चे युवा नेतृत्व विद्वान केवटे व राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, चातारी परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरणकडून समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चातारी परिसरातील फिडरची तांत्रिक तपासणी करावी, वीजपुरवठ्याचे वेळापत्रक नियमित करावे आणि कृषिपंपांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    1
    आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी

गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे .
वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती
    1
    सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती
महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.
    1
    पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार
- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी
हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
“शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    18 hrs ago
  • इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    1
    इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    1
    पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले.
दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.
    2
    रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या!
रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.
    user_Shankar Maroti Sadar
    Shankar Maroti Sadar
    रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
    1
    ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.
    1
    बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.