मतदार यादी पडताळणी शिबिरासाठी नागरिकांना जाहीर आवाहन.. मतदार यादी पडताळणी शिबिरासाठी नागरिकांना जाहीर आवाहन पाचोरा (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक १४ तसेच कृष्णापुरी परिसरातील नागरिकांसाठी मतदार यादी पडताळणीसंदर्भात महत्त्वाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या मताधिकाराची नोंद अचूक राहावी यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्या, दिनांक १ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत मारोती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा येथे मतदार यादी पडताळणी शिबिर होणार आहे. या शिबिरात संबंधित विभागातील सर्व बीएलओ (Booth Level Officers) उपस्थित राहणार असून नागरिकांच्या नोंदी तपासून आवश्यक दुरुस्त्या व मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः ज्या नागरिकांची नावे २००२ च्या मतदार यादीत होती, परंतु २०२४ च्या अद्ययावत मतदार यादीत त्यांची नावे अद्याप मॅप झालेली नाहीत, त्यांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली नोंद पूर्ण करून घ्यावी. यामुळे भविष्यात मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही. नगरसेवक प्रदीप भगवान वाघ व नगरसेविका सुरेखा अशोक पाटील यांनी सर्व नागरिकांना वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत महत्त्वाचे असून, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. सदर शिबिरामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1