भारत देश सहिष्णु, सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जागा दाखवेल माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल, मोझरीतील पुरातन राममंदिरात रामनवनीचा जल्लोष प्रतिनिधी, अमरावती, ता. ७- काही लोक किंवा काही पक्षांना प्रभू श्रीराम तसेच हिंदू धर्म ही आपली जागिरी असल्यासारखे वाटते. मात्र तसे नाही आहे, आम्ही पण हिंदु आहोत आणि सर्वधर्म समभाव आमच्या रक्ता -रक्तात भिनलेला आहे, आम्ही पण पिढ्यापिढ्या हिंदु सण उत्सव मोठ्या धडाक्यात साजरे करतो. मात्र काही मंडळी धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकून घेत आहे, एखादवेळी हे ठिक आहे. मात्र देशातील सहिष्णु जनता फार काळ हे सहन करणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी विरोधकांना दिला आहे. श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर तिवसा तालुक्यातील मोझरी येथील जवळपास ७०० वर्षे पुरातन श्रीराम मंदिरात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पुरातन मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. शिवाय फटाक्यांची आतषबाजी, रामनामाचा गजर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या महोत्सवाच सहभागी झाले होते. मंत्रोच्चारातअॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जयश्री रामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला होता. शिवाय गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी सुद्धा या महोत्सवाला उपस्थिती दर्शवून सर्वधर्म समभावाच्या भावनेची जपणूक केली. त्यासोबच रामनवमीनिमित्त आय़ोजित महाप्रसादामध्ये अनेक मुस्लिम बांधव सुद्दा सहभागी झाले होते. हिंदु - मुस्लिम एकात्मता दर्शविणारा हा अनोखा सोहळा रामनवमीच्या निमित्ताने घडूण आला होता. ---------- आम्ही पिढ्यानपिढ्या श्रीरामाला माननारे आहोत, हा देश सर्वधर्मसमभाव माननाण्यांचा देश आहे. आणि या सर्वधर्मसमभावाला कुणी तडा देत असेल तर या देशातील नागरिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत, शेवटी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्वतोपरी आहे, आम्ही कॅांग्रेसचे आहोत आणि हिंदु धर्माचे सुद्धा, कॅांग्रेसची संस्कृती कधीच कुण्या धर्माचा द्वेष करायला शिकवित नाही,राजकारण नसले तरी चालेल मात्र आम्ही सर्वधर्मांचा सन्मान करित राहू, : अॅड. यशोमतीताई ठाकूर, माजी मंत्री, तथा कॅांग्रेस नेत्या.
भारत देश सहिष्णु, सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जागा दाखवेल माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल, मोझरीतील पुरातन राममंदिरात रामनवनीचा जल्लोष प्रतिनिधी, अमरावती, ता. ७- काही लोक किंवा काही पक्षांना प्रभू श्रीराम तसेच हिंदू धर्म ही आपली जागिरी असल्यासारखे वाटते. मात्र तसे नाही आहे, आम्ही पण हिंदु आहोत आणि सर्वधर्म समभाव आमच्या रक्ता -रक्तात भिनलेला आहे, आम्ही पण पिढ्यापिढ्या हिंदु सण उत्सव मोठ्या धडाक्यात साजरे करतो. मात्र काही मंडळी धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकून घेत आहे, एखादवेळी हे ठिक आहे. मात्र देशातील सहिष्णु जनता फार काळ हे सहन करणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी विरोधकांना दिला आहे. श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर तिवसा तालुक्यातील मोझरी येथील जवळपास ७०० वर्षे पुरातन श्रीराम मंदिरात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पुरातन मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. शिवाय फटाक्यांची आतषबाजी, रामनामाचा गजर सर्वांचे लक्ष
वेधून घेणारा होता. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या महोत्सवाच सहभागी झाले होते. मंत्रोच्चारातअॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जयश्री रामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला होता. शिवाय गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी सुद्धा या महोत्सवाला उपस्थिती दर्शवून सर्वधर्म समभावाच्या भावनेची जपणूक केली. त्यासोबच रामनवमीनिमित्त आय़ोजित महाप्रसादामध्ये अनेक मुस्लिम बांधव सुद्दा सहभागी झाले होते. हिंदु - मुस्लिम एकात्मता दर्शविणारा हा अनोखा सोहळा रामनवमीच्या निमित्ताने घडूण आला होता. ---------- आम्ही पिढ्यानपिढ्या श्रीरामाला माननारे आहोत, हा देश सर्वधर्मसमभाव माननाण्यांचा देश आहे. आणि या सर्वधर्मसमभावाला कुणी तडा देत असेल तर या देशातील नागरिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत, शेवटी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्वतोपरी आहे, आम्ही कॅांग्रेसचे आहोत आणि हिंदु धर्माचे सुद्धा, कॅांग्रेसची संस्कृती कधीच कुण्या धर्माचा द्वेष करायला शिकवित नाही,राजकारण नसले तरी चालेल मात्र आम्ही सर्वधर्मांचा सन्मान करित राहू, : अॅड. यशोमतीताई ठाकूर, माजी मंत्री, तथा कॅांग्रेस नेत्या.
- ही महाराष्ट्रातील अमरावती नाही तर आंद्र प्रदेशातील अमरावती आहे1
- अमरावती - महाराष्ट्र की राजनीति में नया मोड़1
- महाराष्ट्र किंग देहशत #अमरावती चा किंग#नाद #बैलगाडाlover #bull #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद ओ शेठ 👑🐂1
- #Maharashtra #Amravati #Eid ka #Mela #trending #video #amravati #love #music #love 🎡🎠🎢🎡🎠🎡🎡🎠🤹🤼🤡🎡🎡1
- 🏵️ll श्रामनेरी धम्मदीक्षा शिबीर ll भिमटेकडी🌸1
- शिक्षक मेळावा📍अमरावती1
- कांग्रेस ने लगाए बीजेपी पर ईवीएम में गड़बड़ी के आरोप, बोली ईवीएम में छेड़छाड़ की शिकायत करने वाले इंस्पेक्टर कासले को क्यों किया गया गिरफ्तार, बीजेपी बोली आरोप बेबुनियाद.... देखिए राजपथ न्यूज़ पर....1
- तिवसा - घर में निकले रसेल वाइपर सांप के 40 से अधिक बच्चे1