logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर विदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ब मध्येही लढाणा दि.29 (जिमाका): विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली असून बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे किमान तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता सायंकाळच्या सुमारास २१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत आहे. संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. सोमवारी विदर्भातील विविध शहरांमधील तापमानाची स्थिती खालीलप्रमाणे राहिली: विदर्भातील अमरावती (४६.६ C) आणि वर्धा (४६.५°C) ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. त्यानंतर अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.० अंश, चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश आणि यवतमाळमध्ये ४५.२ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. गोंदिया (४१.०°C) आणि भंडारा (४२.०°C) या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी राहिला. नागरिकांना खबरदारीचे आवाहन : जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. 00000

5 hrs ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
5 hrs ago
e42e6ca5-40ac-4ff1-85cc-d8a151175db1

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    1
    धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.