महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी पारनेरमध्ये निर्भया पथक करा: सौ. सुषमा ताई रावडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ.सुषमा ताई रावडे यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पारनेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र निर्भया पथक स्थापन करून ते प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना या बाबत निवेदन सादर केले आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा आणि महिलांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे यांनी ही मागणी पुढे आणली आहे. तालुक्यातील विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत निर्भया पथकाची तातडीने स्थापना करून त्याचे नियमित गस्त व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, बसस्थानके आणि गर्दीच्या परिसरांमध्ये निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि कार्यपद्धती दर्शविणारे माहितीफलक व बॅनर्स लावण्यात यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे. महिलांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात यावे, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम, जनसंवाद उपक्रम, प्रबोधनपर सत्रे आणि कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांचा सातत्याने प्रचार-प्रसार करण्यात यावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळू शकेल, असेही रावडे यांनी म्हटले आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, महिला शहराध्यक्षा कविता औटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोली
महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी पारनेरमध्ये निर्भया पथक करा: सौ. सुषमा ताई रावडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ.सुषमा ताई रावडे यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पारनेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र निर्भया पथक स्थापन करून ते प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना या बाबत निवेदन सादर केले आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा आणि महिलांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे यांनी ही मागणी पुढे आणली आहे. तालुक्यातील विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत निर्भया पथकाची तातडीने स्थापना करून त्याचे नियमित गस्त व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी
करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, बसस्थानके आणि गर्दीच्या परिसरांमध्ये निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि कार्यपद्धती दर्शविणारे माहितीफलक व बॅनर्स लावण्यात यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे. महिलांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात यावे, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम, जनसंवाद उपक्रम, प्रबोधनपर सत्रे आणि कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांचा सातत्याने प्रचार-प्रसार करण्यात यावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळू शकेल, असेही रावडे यांनी म्हटले आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, महिला शहराध्यक्षा कविता औटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोली
- लोणावळा पुन्हा पर्यटकांनी गजबजला; भुशी धरणावर निसर्गाचा अप्रतिम नजारा... लोणावळा, पुणे : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य पुन्हा खुलले असून भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे... #Lonavala #BhushiDam #LonavalaRain #Pune #Maval #Monsoon #Tourism #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला1
- मांजरी बुद्रुक रास्ता रोको आंदोलन जनता अदालतला न्यूज मांजरी बुद्रुक पुणे1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- "हायत ना चोर का नाहीत... का तुम्हाला वाईट वाटते त्यांना मी चोर म्हणतोय म्हणून...!"1
- पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल . Watch full video1